घरताज्या घडामोडीLive Update: भाजपने नागपूर गमावले, धुळे कमावले तर पालघरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

Live Update: भाजपने नागपूर गमावले, धुळे कमावले तर पालघरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

Subscribe

राज्यातील सहा जिल्हापरिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांसाठी काल ७ जानेवारी रोजी मतदान पार पडले. या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत.

नागपूर, धुळे, नंदुरबार, पालघर, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदांचे आज निकाल लागत आहेत. यामध्ये नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार आणि वाशिम जिल्हा परिषदांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. तर अकोला जिल्हा परिषदेच्या काही जागांचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होतील. नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सपशेल पराभव झाला असला तरी धुळ्यात मात्र कमळ फुलले आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. तर नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -