घरमुंबईकेबीसीच्या नावाने महिलेची फसवणुक

केबीसीच्या नावाने महिलेची फसवणुक

Subscribe

सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये २५ लाख रुपये लागल्याचे सांगून महिलेला फसवण्यात आले आहे.

केबीसीच्या नावाने महिलेची फसवणूक झाल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये २५ लाख रुपये लागल्याचे सांगून महिलेला फसवण्यात आले आहे. बँकेचा तपशील आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत.

अशी घडली घटना

रेणुका बनसोडे या वडाळा येथे राहतात. अॅक्सिस बँकेच्या नावाने त्यांना एक संदेश आला. अनोळखी व्यक्तीने संदेश पाठविल्याने रेणुका यांनी त्या व्यक्तीला संपर्क केला. केबीसीमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला आहे. ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर निवडण्यात आला आहे. तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे त्या व्यक्तीने रेणुका यांना सांगितले. रेणुका यांना विश्वास बसावा यासाठी त्या व्यक्तीने केबीसीचे प्रमाणपत्र सुद्धा पाठवले. परिणामी रेणुका यांचा त्या व्यक्तीवर विश्वास बसला. एवढेच नाही तर अॅक्सिस बँकेच्या मॅनेजरचा फोटोसुद्धा त्याने रेणुका यांना पाठवला. रेणुका यांचा विश्वास बसल्याने त्यांनी काही हजार रुपये या व्यक्तीने दिलेल्या खात्यात ट्रान्स्फर केले.

- Advertisement -

पोलिसांचा तपास सुरु

पण त्यानंतरही वेगवेगळी कारणे सांगून ती व्यक्ती रेणुका यांच्याकडे पैशांची मागणी करतच होती. त्यासाठी रेणुका यांनी स्वतःसह सासूचे दागिने गहाण ठेवले. एवढेच नाही तर मुलीच्या नावावर बँकेत ठेवण्यात आलेल्या एफडी सुद्धा मोडल्या. अशाप्रकारे जवळपास २ लाख ८७ हजार रुपये रेणुका यांनी पाठवले. मात्र तरीही ती व्यक्ती रेणुका यांच्याकडे आणखीन पैसे मागू लागली. तेव्हा रेणुका यांना संशय आला. रेणुका यांनी पैसे परत मागितल्याने त्या व्यक्तीने संपर्क तोडला. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रेणुका यांनी पोलिसांत धाव घेतली. बँक तपशील आणि तांत्रिक पुराव्यांवरून पोलीस भामट्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -