घरमहाराष्ट्रभाजपमधील घराणेशाहीची खडसेंनी वाचली यादी, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंमध्ये जुंपली

भाजपमधील घराणेशाहीची खडसेंनी वाचली यादी, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंमध्ये जुंपली

Subscribe

राज्यात करोनाचे संकट असताना भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. विधान परिषद निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर आता खडसे चांगलेच आक्रमक झाले असून, आता तर त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जसास तसे उत्तर देत भाजपमधील घराणेशाहिचा पाढा वाचून दाखवला. एकनाथ खडसे यांच्या कुटूंबाला खूप काही दिले या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा खडसेंनी समाचार घेत आम्ही जे काही मिळवले ते स्वतःच्या हिमतीवर मिळवले असे सांगत खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. ज्यावेळी पक्षात यायला कुणीच तयार नव्हेत, उमेदवारी घेत नव्हते त्याकाळात मी निवडून येत होतो.

मी आतापर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झालेला नाही. आता पक्षात सक्रिय झालेल्यांना पाटील यांना हा इतिहास माहीत नाही अशी टीका त्यांनी केली. एवढेच नाही तर तुम्ही माझ्यावर घराणेशाहीची टीका करता पण माझ्या घरात केवळ मला आणि सुनेला तिकीट देण्यात आले असे सांगत त्यांनी भाजपमधील घराणेशाहीची यादी वाचली. देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. देवेंद्र मुख्यमंत्री त्याआधी आमदार राहिले. त्यांच्या काकू 26 वर्ष आमदार होत्या तसेच त्या मंत्री देखील राहिल्या आहेत. एवढेच नाही तर रावसाहेब दानवे मंत्री आहेत. त्यांचा मुलगा आमदार आहे विखे-पाटलांच्या घराण्यात आमदारकी खासदारकी आहे याला घराणेशाही म्हणायचे नाही का?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान चंद्रकांत पाटील विद्यार्थी परिषदेमधून पक्षात आले.त्यांना पक्षाचा इतिहास माहीत नाही पक्षांचे पक्षाच्या जडण-घडणीत त्यांचे योगदान शून्य असल्याची टीका खडसे यांनी केली आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनीही वाचली यादी –
दरम्यान सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टीका करत त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला खडसे सात वेळा आमदार झाले दोन वेळा त्यांना मंत्रिपद मिळाले त्यांच्या सुनेला दोनदा खासदारकी मिळाली तर मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील मिळाले एवढेच नाही तर त्यांच्या पत्नीला महानंदा चा अध्यक्षपद देण्यात आले आहे तसेच भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाने हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले होते. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला तिकीट देण्यात आले. तेव्हा खडसेंनी बागडे यांच्या पाठीत खंजीर खूपसल नाही का? तसेच जगवानी यांना देण्यात आलेले विधान परिषदेचे तिकीट कापून खडसेंनी मुलाला उमेदवारी दिली तेव्हा तुम्ही तुम्ही त्यांच्या खंजीर खुपसला नाही का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -