घरमहाराष्ट्रPune Unlock: पुणेकर ऐकेनात, सिंहगडावर केली गर्दी, पोलीस हतबल

Pune Unlock: पुणेकर ऐकेनात, सिंहगडावर केली गर्दी, पोलीस हतबल

Subscribe

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. यात मॉल, रेस्टॉरंट व दुकाने काही अटी व शर्थीवर सुरू करण्यात आली आहेत. पण पर्यंटनस्थळ मात्र खुली करण्यात आलेली नाहीत. मात्र असे असतानाही काही अतिउत्साही पुणेकरांनी ऱविवारी पहाटेपासूनच सिंहगडावर एकच गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी अडवल्यानंतर या पर्यंटकांनी पोलिसांबरोबर बाचाबाची केली. अखेर पोलिसांची ज्यादा कुमक मागवण्यात आली. त्यानंतर ही गर्दी आटोक्यात आली.

लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासूनच पुणेकर मोठ्या संख्येने मॉल व बाजारात गर्दी करत आहेत. यामुळे पुणे पोलिसांची डोकेदुखी आधीच वाढली आहे. याचदरम्यान, या रविवारी मोठ्या संख्येने पुणेकर पोरा टोरांना घेऊन तर काही तरुण ट्रेकींगसाठी सिंहगडावर पोहोचले. बघता बघता हा आकडा शेकडोच्या घरात पोहचल्याने पोलिसांचीही धावपळ झाली. विशेष म्हणजे यातील अनेकजण विनामास्क होते.

- Advertisement -

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत हे अतिहौसी पर्यंटक सिंहगडावर धुडगूस घालत होते. पोलीस व वनकर्मचाऱ्यांनी सिंहगडावर प्रवेश नाही असे वारंवार सांगत असतानाही नागरिक ऐकत नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यंटक सिंहगडावर येणे अपेक्षित नसल्याने गर्दीला आवर घालताना पोलिसांची पुरती दमछाक झाली. अखेर पोलिसांची ज्यादा कुमक मागवण्यात आली. त्यानंतर पर्यंटकांची गर्दी पांगली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -