घरक्राइमपिंपळगाव टोल नाक्यावर महिलांमध्ये तुफान फ्री स्टाईल

पिंपळगाव टोल नाक्यावर महिलांमध्ये तुफान फ्री स्टाईल

Subscribe

सामाजिक संघटनांकडून महिला कर्मचार्‍यावर कारवाईची मागणी

अरेरावीमुळे सातत्याने चर्चेत राहणार्‍या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर महिला कर्मचार्‍याने एका प्रवाशी महिलेला मारहाण केल्याची घटना पुढे आलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामाजिक संघटनांनी टोल प्रशासनाचा निषेध करत महिला कर्मचार्‍यावर कठोर कारवाईची मागणी केलीय. गेल्या आठवड्यात सटाणा येथील एका महिलेला टोल नाक्यावर मारहाण झाली होती. याबाबत कारवाई केली असल्याची माहिती टोल प्लाझाचे व्यवस्थापक योगेश सिंग यांनी दिली. दरम्यान, फास्ट टॅग सुविधा उपलब्ध होऊनही कर्मचार्‍यांची उद्धट वागणूक कमी झाली नसल्याचंच या घटनेतनं पुढे आलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -