घरमहाराष्ट्रसरकार बळीराजाच्या मुळावर उठलंय; शेतकऱ्यांकडून अवयव विक्री प्रकरणी वडेट्टीवारांचा संताप

सरकार बळीराजाच्या मुळावर उठलंय; शेतकऱ्यांकडून अवयव विक्री प्रकरणी वडेट्टीवारांचा संताप

Subscribe

मुंबई : मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदाही पावसाने अपेक्षित हजेरी लावली नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी किडनी (Kidney), लिव्हर (Liver), डोळे (Eyes) व इतर अवयव विकत घ्या, अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारवर संताप व्यक्त केला आहे. (The government has risen on the roots of Baliraja Vijay Wadettivar anger in case of sale of organs by farmers)

हेही वाचा – कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला; किडनी 75 हजार, तर लिव्हर आणि डोळ्यांची किंमत किती पाहा?

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केला की, राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकत नसल्यामुळे शेतकरी अशा स्थितीत जगणार तरी कसा? सोयाबीन, कापसाचं पीकं गेलं, धानाला अनेक रोगांनी उद्धवस्त केलं आहे. यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे आज मराठवाड्यात 36 टक्के पाणी धरणामध्ये शिल्लक आहे. अशा स्थितीत आपल्याला 7 महिने काढायचे आहेत. पिण्याचं पाणी नाही, शेतीमध्ये पीक येत नाही, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांवर किडणी, शेती आणि वावर विकायची पाळी आली आहे. कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर राज्यामध्ये कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, नाहीतर शेतकरी वाचणार नाही, अशी भिती विजय वडेट्टीवर यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गटाच्याच पावलावर पाऊल, शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करण्याची अजित गटाची मागणी

अवयव विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी का घेतला?

यंदा मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्हात दुष्काळाची गंभीर स्थिती बनली आहे. खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सोयाबीन, कपाशी आदी पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि  सरकारकडूनही शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे याठिकाणी शेतकरी आत्महत्यांचा वेग वाढला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी दहा नग याप्रमाणे  किडणी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये आणि डोळे 25 हजार रुपये असे स्वतःचे अवयव विकत घ्या, अशी मागणी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -