घरमहाराष्ट्र..तर खोके देण्याची तयारी सरकारने दाखवली असती, दुष्काळावरून वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

..तर खोके देण्याची तयारी सरकारने दाखवली असती, दुष्काळावरून वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : यंदा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धान्याबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी आमदार, खासदार असते तर त्यांच्याकरिता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा – कार्यक्रमाला ‘आपल्या दारी’ नाव असले म्हणजे…, रोहित पवार यांचा राज्य सरकारला टोला

- Advertisement -

दुष्काळनिवारणार्थ केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरून विजय वडेट्टीवार यांनी अलीकडेच राज्य सरकावर निशाणा साधला होता. आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर असून त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे, याचे भान महायुती सरकारला नाही, असा आरोप करतानाच. 10 किडन्यांचे 75 हजार रुपये, 10 लिव्हरचे 90 हजार रुपये आणि 10 डोळ्यांचे 25 हजार रुपये यासह शरीरातील इतर अवयवांचे रेटकार्ड तयार करून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेच शेतकरी जर आमदार खासदार असते तर, त्यांच्याकरिता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती; पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – महाराष्ट्रात आता जुगार बचावो मंत्रालय सुरू होणार नाही ना? ठाकरे गटाचा खोचक सवाल

दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी दोनच दिवसांपूर्वी केला आहे.

राज्य सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राज्याला चार ते पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. केंद्राकडून येणारी मदत आता राज्याला मिळणार नाही. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे निधी मिळणे अवघड आहे. शेजारच्या कर्नाटक राज्याने दुष्काळ निवारणाचे सर्व काटेकोर नियोजन करून केंद्र सरकार निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. जर कर्नाटकला हे जमत असेल तर महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला होता.

हेही वाचा – माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही; ईडी चौकशीला हजर राहण्यापूर्वी किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -