घरठाणेनववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला

Subscribe

सहा वर्षाची चिमुकली आश्चर्यकारकरीत्या बचावली

भिवंडी । मुंबई भांडुप येथुन दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाकरीता निघालेल्या दांपत्याचा मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. तर या अपघातामध्ये दुचाकीवरील सहा वर्षाची चिमुकली मृण्मयी आश्चर्यकारकरित्या बचावली असून ती सुखरूप आहे.

मनोज सोमा जोशी (३६) आणि मानसी मनोज जोशी (३४) असे मृत दाम्पत्याचे नाव असून ते तानाजी वाडी, टेंभीपाडा भांडुप पश्चिम येथे रहात होते. ते सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत शिर्डी येथील साईदर्शनाने करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या सोबत भांडुप पश्चिम येथील तानाजी वाडी चाळीतील रहिवाशी काही दुचाकीवर तर काही मिनी बसने शिर्डी येथे जाण्याकरता सकाळी साडेसात वाजता निघाले. या चाळीतील मनोज जोशी, त्यांची पत्नी मानसी आणि मुलगी मृण्मयी असे तिघे आपल्या मोटरसायकलवरून शिर्डी दर्शन करता निघाले.

- Advertisement -

भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मुंबई नाशिक महामार्गावर येवई ते वडपा या दरम्यान आले असता नाशिकच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरने भरधाव बेजबाबदारपणे कंटेनर चालवून दुचाकीस मागून धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील जोशी दाम्पत्य कंटेनरच्या मागील चाकात आले आणि घटनास्थळीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. परंतु त्याच वेळेस त्यांची सहा वर्षाची चिमुकले मृण्मयी ही गाडीवरून विरुद्ध दिशेला पडल्यामुळे तिला कोणतीही दुखापत न होता ती आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.

या घटनेनंतर भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी कंटेनर चालक कपिल राजाराम देव याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय आयजीएम रुग्णालयात रवाना केले. तर मनोज जोशी या सोबत निघालेला शेजारी विक्रांत पायरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे करीत असून या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -