घरताज्या घडामोडीST Strike: एसटी विलीनीकरणावर उद्या हायकोर्टात सुनावणी; सदावर्ते राज्य सरकारची करणार पोलखोल

ST Strike: एसटी विलीनीकरणावर उद्या हायकोर्टात सुनावणी; सदावर्ते राज्य सरकारची करणार पोलखोल

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनात विलीनीकरणावरुन सुरू असलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता एसटी विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसटी विलीनीकरणाबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात निर्णय जाहीर करणार आहे. यासंदर्भात बोलताना एसटी कर्मचाऱ्यांचे बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘उद्या सरकारची कशी पोलखोल करतो, ते बघा.’

दरम्यान आज तरी लालपरीचा तिढा सुटेल अशी आशा होती. आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरकारने एसटीबाबत काय निर्णय घेतला आहे? हे आम्हाला पाहायचे आहे असे म्हणत न्यायमूर्तींनी ही सुनावणी पुढे ढकलली आहे. एसटी विलीनीकरणाबाबतच्या संपावर उद्या सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

यासंदर्भात माध्यमांसोबत बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘सरकारला अडीच वाजता सुनावणी होवू द्यायची नव्हती. मला जे दबावाखाली ठेवून आमच्या हत्येच्या कटाखाली ही सुनावणी पुढे कशी जाईल, कष्टकरांचे जास्त मृत्यू कशी होतील, हे पाहणारे सरकार आहे. आजपर्यंत सरकारने अॅफिडेबिट आणून दिले नाही. हे सरकारचे कशाप्रकारचे वर्तन आहे? उद्या न्यायालयाने १०.३० वाजता सुनावणी ठेवल्याचे माध्यामाद्वारे समजतंय. उद्या कशी सरकारची पोलखोल करतो,बघा. सरकारच्या गैरवर्तनाचे, सरकारच्या एकाधिकारशाहीचे, सरकारच्या हुकूमशाहीचे, सरकारच्या मुघली पद्धतीचे, सरकारच्या हरवलेल्या भानाचे कागदपत्र पुराव्यासह सादर करतो. विलीनीकरणाचा लढा कष्टकऱ्यांसाठी कसा जिंकण्याकडे घेऊन जातो, हे बघाच. तसेच उद्या न्यायालयात काय होईल, ते पाहा.’


हेही वाचा – संजय राऊतांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त, ईडीची मोठी कारवाई

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -