घरक्राइमअधिकाऱ्यांची खाबुगिरी थांबेना; ४० लाखांची मागणी करणारा दिंडोरीचा प्रांत अधिकारी जाळ्यात

अधिकाऱ्यांची खाबुगिरी थांबेना; ४० लाखांची मागणी करणारा दिंडोरीचा प्रांत अधिकारी जाळ्यात

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आणि विभागात मागील ६ महिन्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाईची मालिका कायम ठेवलेली असूनही सरकारी अधिकाऱ्यांना पैसा खाण्यावर अजूनही पायबंद बसला नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. सातत्याने लाचलुचपत विभागाची धडक कारवाईत अनेक अधिकारी जाळ्यात सापडत असूनही इतर अधिकारी इतके निर्ढावलेले आहेत की त्यांची लाचखोरी कुठेही कमी होताना दिसत नाहीये. असाच एक अधिकारी बुधवारी (दि. २८) जाळ्यात अडकला आहे.

व्यवस्थेला बटिक बनवलेल्या लाचखोरीच्या किडी मधील आजून एक किडा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. दिंडोरी तालुक्यातील प्रांत अधिकारी नीलेश अपार याच्यावर तब्बल ४० लाखांची लाच मागीतल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापुर या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. तेथील एका कंपनी मालकाला आपली जागा कायम करायची होती. या प्रक्रियेबाबतचे अधिकार प्रांत अधिकाऱ्याला प्राप्त आहेत. कंपनीची जागा कायम करण्याच्या मोहबदल्यात प्रांत अधिकारी नीलेश अपार याने कंपनी मालकाकडे तब्बल ४० लाख रुपयांची मागणी केली.

- Advertisement -

याबाबत फिर्यातदार कंपनी मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. विभागाने याबाबत शहानिशा केली. यानंतर नीलेश अपार याच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -