घरमहाराष्ट्रपहिल्या टप्प्याचा प्रचार थांबला

पहिल्या टप्प्याचा प्रचार थांबला

Subscribe

राज्यातील सात मतदार संघात १२२ उमेदवार,देशातील ९१ मतदार संघात ११ एप्रिलला होणार मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी दुपारी पाच वाजता संपला. येत्या ११ एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील सात मतदार संघाचा समावेश आहे. या सात मतदार संघात १२२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. त्यापैकी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किशोर गजभिये, नाना पटोले, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आणि सुरेश धानोळकर, भावना गवळी, वैशाली येंडे, माणिकराव ठाकरे या दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे. १९ मे रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होऊन २३ मे रोजी मतमोजणी होईल.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता या निवडणुकीचा प्रचार संपला. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया आणि वर्धा येथे प्रचार सभा घेतली. तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी वर्धाला सभा घेतली. मोदी यांची वर्ध्याची सभा फसली. मात्र मोदींच्या गोंदियाच्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रत्येक उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसाठी तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी सभा घेतल्या

- Advertisement -

पहिल्या टप्प्यातील मतदान
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, आणि यवतमाळ-वासिम या सात मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात १२२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

देशात गुरुवारी ९१ मतदारसंघांत मतदान
देशभरात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात मतदार संघासह ९१ मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात १२८५ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. हे मतदान आंध्र प्रदेशतील २५, अरुणाचल प्रदेश -२, आसाम -५, बिहार -४, जम्मू-काश्मीर -२, महाराष्ट्र -७, मणीपूर -१, मेघालय -२, मिझोराम -१, ओडिशा -४, सिक्किम -१, त्रिपुरा -१, उत्तर प्रदेश-८, प. बंगाल -२, नागालॅण्ड -१, अंदामान आणि निकोबार -१, लक्षद्वीप १, छत्तीसगड -१, उत्तराखंड -५ तर तेलंगणातील १७ मतदार संघात लोकसभेची निवडणूक होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -