घरमहाराष्ट्रनाशिक‘बिर्याणी’वरून तुफान हाणामारी

‘बिर्याणी’वरून तुफान हाणामारी

Subscribe

लासलगाव स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील बाजारतळ येथे सोमवारी (८ एप्रिल) रात्री बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी मध्ये झाल्याची घटना घडली.

लासलगाव स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील बाजारतळ येथे सोमवारी (८ एप्रिल) रात्री बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी मध्ये झाल्याची घटना घडली. फिर्यादी सुरेश सहादु पाथरे, (रा. संजयनगर) यास लाथा बुक्क्याने मारहाण करत जखमी केले आहे. यापूर्वी अशा अनेक हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. या भागामध्ये हातगाड्यांवर अवैध मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जाते. आणि यातून वाद होत परिसरामध्ये दहशत माजवली जाते. सामान्य आणि विशेषतः महिलांना या भागातून सायंकाळी चालणे सुध्दा मुश्किल होत आहे.

वाहनाची तोडफोड करणे, हे प्रकार तर या भागाला काही नवीन नाही. बाजारतळातून शाळा, कॉलेजमध्ये जाण्याचा रस्ता असल्याने विद्यार्थ्यांना जाताना भीती वाटते. सोमवारी रात्री साडेनऊला सुरेश पाथरे हा शमसुद्दीन असलम शेख (रा. ब्राह्मणगाव विंचूर) यांच्या हातगाडीवर बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. ऑर्डर देऊनही बिर्याणी येत नसल्याने सुरेश पाथरे व शम्ससुदिन शेख, इम्रान अकील मंसूरी, मोसिन अकील मंसूरी, मुजमिल इरफान शेख यांच्यात बाचाबाची झाली. याचे पर्यावसन तुफान हाणामारीमध्ये झाले. इम्रान मंसुरी याने गाड्या जवळच असलेली खुर्ची उचलत फिर्यादी सुरेश पाथरेच्या डोक्यात मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पाथरेला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. जोपळे तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -