घरदेश-विदेशजागा कमी होऊनही सट्टेबाजांकडून भाजपचा भाव वधारलेला!

जागा कमी होऊनही सट्टेबाजांकडून भाजपचा भाव वधारलेला!

Subscribe

पहिल्या टप्प्यात येऊन ठेपलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लागून राहिले असून सट्टे बाजारात देखील मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु झाली आहे. सट्टेबाजारातील बुकींच्या म्हणण्यानुसार यंदाची लोकसभा निवडणूक सट्टेबाजारासाठी अतिशय महत्वाची आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असल्यामुळे भाजपाचे पारडे जड होते, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपने २७२ जागेवर विजय मिळवला होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता बुकींनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्याचा प्रचार काल संपला. देशातील अनेक राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे सट्टेबाजार देखील गरम झाला आहे. यंदा बुकींकडून यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅप्स वापरण्यात येत आहेत. या अप्सच्या माध्यमातून सट्टेबाजारात लहान मोठ्या बुकींकडून बेटिंग स्वीकारण्यात येत आहेत. मोठ्या बुकींकडून लहान बुकींना बेटिंग स्वीकारण्याची मर्यादा निश्चित कऱण्यात आली आहे.

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यानंतर दहश-तवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा बहुमताने येईल असे दुबईत बसलेल्या बड्या बुकींचे मत आहे.बुकींच्या मते दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या हवाई हल्ल्यामुळे भाजपाचे पारडे जड झाले असले तरी त्यांना या लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या निडणुकीत मिळवलेल्या जागांमध्ये मोठी घटही होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात भाजपा आणि मोदी यांचे रेटिंग कमी झाले होते, परंतु खुल्या आरक्षणाचा निर्णय, अपेक्षित बजेट आणि सर्जिकल स्ट्राईकने मोदींचे रेटिंग वाढल

असल्याचे सट्टेबाजारात व्यवहार करणार्‍या सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपाला यंदा २४० जागेवर निवडून येण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रत्येक रुपयामागे भाजपचा दर ०.२८ असून असून, भाजपच्या जागा कमी होण्याचे चिन्ह दिसताच हा दर ०.६२ वर जाण्याचीही शक्यता आहे, तसेच काँग्रेसने 77 जागांवर विजय मिळविल्यास त्याचा दर दीड रुपये असेल जर काँग्रेस आघाडीच्या जागा वाढण्याची शक्यता असल्यास त्याचा दर १.२ होण्याची शक्यता आहे. सूत्राच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सट्टेबाजारात भाजपाला फक्त 180 जागांची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही परिस्थिती वेगाने बदलत गेली. २०१४च्या निवडणुकीत बेकायदेशीरित्या चालवण्यात येणार्‍या सट्टेबाजारात सट्टेबाजीत १ लाख कोटींचा आकडा पार केला होता, या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बेकायदेशीर सट्टेबाजारात नवीन रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

सूत्रांच्या म्हणण्यानुसार या लोकसभा निवडणुकीमध्ये सट्टेबाजी हायटेक असणारा असून स्काय एक्सचेंज आणि लोटस सारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स भारताच्या बाहेरून ऑपरेट केले जात असल्याचे सांगितले जाते. हे अ‍ॅप्स मोठ्या बुकींनी छोट्या बुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. परदेशातील बडे बुकीही मोठ्या स्क्रीनवर हा बाजार पाहू शकतील. वृत्त वाहिन्या, तसेच नेत्यांच्या सभा, नेत्याचे भाषण यावरून सट्टेबाजारातील दर कमी जास्त होऊ शकतो आणि हे सर्व अ‍ॅप्सवर अपडेट कऱण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -