घरमहाराष्ट्रआदिवासी वस्ती अंधारात

आदिवासी वस्ती अंधारात

Subscribe

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

सुधागड तालुक्यातील वर्‍हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गाठेमाळ आदिवासीवाडी येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने ही वाडी गेल्या 4 दिवसांपासून अंधारात आहे.महावितरण कंपनीच्या पाली कार्यालयांतर्गत येणार्‍या या भागातील वीज पुरवठा सोमावारपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांना नाहक मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अधूनमधून पडणारा पाऊस आणि हवेतील गारवा यामुळे विषारी प्राण्यांची भीती असल्याने ग्रामस्थ सायंकाळनंतर जीव मुठीत धरून राहतात. वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. याबाबत महावितरण कार्यलयाकडे वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

पीठ गिरणी बंद असल्याने मोलमजुरी करणार्‍यांना सायंकाळी दळण कुठून आणायचे असा प्रश्न पडतो. विजेअभावी मोबाईल चार्ज होत नसल्यामुळे दूरच्या वस्तीवर जाऊन ते चार्ज करावे लागतात. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी गांभीर्य दाखविले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -