घरमुंबईराज्याच्या विकासाचा रोडमॅप टोकियोत सादर

राज्याच्या विकासाचा रोडमॅप टोकियोत सादर

Subscribe

भारत सरकारच्या शिष्टमंडळामध्ये संजीव जयस्वाल एकमेव महापालिका आयुक्त

जपानमधील गुंतवणुकदारांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याच्यादृष्टीने आकर्षित करण्यासाठी राज्यातील नागरी विकास कामाचे सादरीकरण ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करून राज्याच्या विकासाचा रोडमॅप टोकियो येथे पार पडलेल्या भारत-जपान संयुक्त कार्यक्रमाच्या 11 व्या परिषदेमध्ये सादर केला. भारत सरकारच्या शिष्टमंडळामध्ये ते एकमेव महापालिका आयुक्त होते.

टोकियो येथे नागरी विकास या विषयावर 11व्या भारत जपान संयुक्त कार्यक्रम परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी भारत सरकारच्या गृह व नागरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये संजीव जयस्वाल यांचा समावेश आहे. एकमेव महापालिका आयुक्त म्हणून ते या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत. या बैठकीच्या सुरुवातीस जपानचे उपमंत्री कुहिहिरो यामदाव यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले.

- Advertisement -

या परिषदेमध्ये सुरूवातीस गुजरात राज्याच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राच्यावतीने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राज्यामधील एकूणच नागरी विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा घेवून जपानसाठी महाराष्ट्रामध्ये असलेल्या गुंतवणूक संधींची माहिती दिली. जयस्वाल यांच्या या सादरीकरणामुळे महाराष्ट्राच्या नागरी विकासाचा रोडमॅप जपानमध्ये सादर करण्यात आला. या परिषदेमध्ये जपानमधील गृह निर्माणसाठी असलेल्या वित्तीय पॅटर्न, पावसाळी पाण्याचे नियोजन, मलनि:सारण व्यवस्था यासह नागरी विकासाच्या अनुषंगाने अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -