घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : पक्षाकडून दुर्लक्षित झालेले राजकारणातील असंतुष्ट नेते कोणते?

Lok Sabha 2024 : पक्षाकडून दुर्लक्षित झालेले राजकारणातील असंतुष्ट नेते कोणते?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी योग्य उमेदवाराच्या छाननीला सुरूवात केली आहे. अशात यंदाची लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रासाठी विशिष्ट असणार आहे. कारण मागील पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात तीन वेळा सत्तांतर झाले.

आगामी लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी योग्य उमेदवाराच्या छाननीला सुरूवात केली आहे. अशात यंदाची लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रासाठी विशिष्ट असणार आहे. कारण मागील पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात तीन वेळा सत्तांतर झाले. सध्या राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या तिघांचे महायुतीचे सरकार असून विरोधी पक्षातील अनेक खासदार आमदारांनी महायुतीची साथ दिली आहे. शिवाय मागील पाच वर्षांत विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी महायुतीत सहभाग घेताला आहे. पण आता त्यांचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांची नाच्चकी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सत्तेत असलेल्या बहुतांश नेत्यांनी लोकसभेसाठी तयारी केली असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण पक्षश्रेष्टींकडून नाव निश्चित होत असल्याने अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर पाहुयात असे कोणकोणते नेते आहेत ज्यांनी लोकसभेसाठी तयारी केली आहे.

वसंत मोरे

- Advertisement -

सुरुवातील आपण नुकताच ज्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली त्या वसंत मोरेंबाबत जाणून घेणार आहोत. मागील 18 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष व अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी निष्ठावंत असलेल्या वसंत उर्फ तात्या मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. पुण्यातून लोकसभे निवडणुक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु, तिकीट मिळू नये यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. राज ठाकरेंची वेळ मागितली होती. पण वेळ दिली नाही, असे एकनाअनेक आरोप करत वसंत मोरे यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला.

भास्कर जाधव

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनीही पक्षातील नाराजी बोलून दाखवली होती. चिपळूनध्ये भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेच्या ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांच्या डोळ्यात आश्रू आले होते. याच कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी व्यक्त केली होती. सत्ता आली तेव्हा मला मंत्रीपद मिळायला हवे होते. परंतु मिळाले नाही. पक्ष फुटला तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावा होता. पण त्यावेळी मला गटनेते केले नाही. त्यानंतर तुम्ही भाजपसोबत गेले तर मी तुमच्यासोबत नसेल. असं वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. त्यावेळी सर्व गेले तरी चालतील, आपण दोघे राहु आणि दोघे भाजपविरोधात लढत राहू, असे ठाकरेंनी सांगितल्याचे भास्कर जाधव म्हणाले होते. दरम्यान भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत नाराजी समोर आली.

विजय शिवतारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर अनेक आरोप करत हल्लाबोल केला. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. त्यामुळे अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही, असे सांगत पवार कुटुंबियांवर शिवतारेंनी निशाणा साधला. शिवाय, बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असलयाचा दावा त्यांना केला. त्यामुळे आगामी लोकसभेत विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महादेव जानकर

महायुतीतील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रासप पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी परभणीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पण महायुतीच्या जागावाटपाचा तिढी अद्याप सुटलेला नाही. अशात जागावाटपादरम्यान रासपला विचारात न घेतल्यास त्यांनी भाजपलाच इशारा दिला आहे. त्यानुसार, ‘भाजपने माझ्यासोबत आतापर्यंत धोका केला, मात्र मी इमानदारीने त्यांच्यासोबत राहिलो. मी ज्या दिवशी त्यांना धोका देईल त्या दिवशी यांचं सरकार राहणार नाही’, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.

प्रतिभा धानोरकर

काँग्रेस आमदार प्रतिभा धानोकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र लोकसभेसाठी तयारी करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. पक्षातील विरोधामुळे माझ्या पतीचा म्हणजेच माजी खासदार बाळू धानोरकर यांचा जीव गेला. पण एक जीव गेला मात्र आता दुसरा जीव जाणार नाही. याची काळजी मी घेणार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे जागावाटपावेळी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी न दिल्यास प्रतिभा काँग्रेस विरोधात बंडकरून अपक्ष निवडणूक लढवतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – VASANT MORE : पक्ष संपवणाऱ्यांसोबत राहण्याची इच्छा नाही, राजीनाम्याचा उल्लेख करताना वसंत मोरे भावूक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -