घर महाराष्ट्र प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मेल-एक्सप्रेस गाड्यांना कल्याण स्थानकातही मिळणार थांबा, वाचा...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ मेल-एक्सप्रेस गाड्यांना कल्याण स्थानकातही मिळणार थांबा, वाचा…

Subscribe

प्रवाशांचा त्रास कमी करण्याचा निर्णय घेत लांब पल्ल्याच्या 10 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना कल्याण रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मुंबई : आजही अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या अशा आहेत, ज्यांना कल्याण रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी काही वेळा प्रमुख रेल्वे स्थानकांवर म्हणजेच कुर्ला टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जावे लागते. परंतु आता प्रवाशांचा त्रास कमी करण्याचा निर्णय घेत लांब पल्ल्याच्या 10 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना कल्याण रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय नागपूर, कोपरगाव, कान्हेगाव आणि होटगी या रेल्वे स्थानकांत सुद्धा काही गाड्यांना थांबा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (‘These’ Mail-Express trains will also have a halt at Kalyan station)

हेही वाचा – Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज

- Advertisement -

ज्या गाड्यांना कल्याण रेल्वे स्थानकांत थांबा देण्यात आलेला आहे. त्यांना केवळ 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या गाड्या कल्याण रेल्वे स्थानकांत थांबतील त्या केवळ दोन मिनिटांसाठी थांबणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या दुरांतोसह दहा मेल-एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच, काही गाड्यांना कसारा रेल्वे स्थानकातही थांबा देण्यात आला आहे.

‘या’ गाड्यांना मिळणार थांबा…

– 23 ऑगस्टपासून 12261/2 सीएसएमटी-हावडा-सीएसएमटी दुरांतो, 82355 पाटणा-सीएसएमटी, 18519 विशाखापट्टणम-एलटीटी, 17221 काकीनाडा पोर्ट-एलटीटी या दोन्ही गाड्यां कल्याण स्थानकात थांबणार.

- Advertisement -

– 25 ऑगस्टपासून 82356 सीएसएमटी-पाटणा सुविधा आणि 18520 एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस कल्याण स्थानकात थांबणार.

– 24 ऑगस्टपासून 19668 म्हैसूर-उदयपूर सिटी हमसफर, 17221/2 काकीनाडा पोर्ट-एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसला कल्याण स्थानकात थांबा.

– 26 ऑगस्टपासून 12213/4 यशवंतपूर-दिल्ली सराई-यशवंतपूर रोहिला दुरांतो एक्स्प्रेसला नागपूर स्थानकात थांबा.

– 28 ऑगस्टपासून 19667 उदयपूर सिटी-म्हैसूर हमसफर एक्स्प्रेसला कल्याणमध्ये थांबा.

– 23 ऑगस्टपासून 17319/20 हैदराबाद-हुबळी-हैदराबाद एक्स्प्रेसला 23 ऑगस्टपासून कल्याणमध्ये थांबा.

– 26 ऑगस्टपासून 12213/4 यशवंतपूर-दिल्ली सराई-यशवंतपूर रोहिला दुरांतो एक्स्प्रेसला नागपूर स्थानकात थांबा.

– 23 ऑगस्टपासून 17319/20 हुबळी-हैदराबाद-हुबळी एक्स्प्रेसला होटगी स्थानकात थांबा.

– 24 ऑगस्टपासून 18503/4 विशाखापट्टाणम-साईनगर शिर्डी–विशाखापट्टणम एक्स्प्रेसला कोपरगाव स्थानकात थांबा.

– 23 ऑगस्टपासून 11409/10 दौंड-निजामाबाद-दौंड एक्स्प्रेसला कान्हेगाव स्थानकात थांबा.

‘या’ गाड्यांना कसारा रेल्वे स्थानकात थांबा…

23 ऑगस्टपासून 18029/30 एलटीटी-शालिमार-एलटीटी, 17617/8 सीएसएमटी-नांदेड-सीएसएमटी तपोवन, 12071/2 जालना जनशताब्दी, 12109/10 सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी, 17611/2 सीएसएमटी-नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस आणि 13202 एलटीटी-पटना एक्स्प्रेसला कसारा स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

- Advertisment -