घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : अफवा फसरविणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही - दीपक म्हैसेकर

करोना व्हायरस : अफवा फसरविणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही – दीपक म्हैसेकर

Subscribe

पुण्यात करोनाचे ३११ संशयित रूग्ण देखरेखीखाली आहेत.

करोनाशी दोन हात करण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कोणत्या सुविधांची आणखी गरज भासणार आहे. याचा सायंकाळपर्यंत एक आढावा करून अहवाल सादर करू आणि त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल. करोना तपासणीदरम्यान काही जण अधिक पैसे घेत आहेत, हे काल आपण आमच्या निदर्शनास आणून दिले आहे. अशा चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. एकाचे उत्तर समाधानकारक असल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले आहे. परंतु इतर तिघांना अद्याप सोडून देण्यात आलेले नाही. तसेच पुण्यात ३११ संशयितांवर उपचार सुरू आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली.


हेही वाचा – पुणेरी शैलीत खणाणले, आठवड्यातच १४ हजार ‘करोना’चे कॉल्स


 

- Advertisement -

आजपर्यंत आपण ७०० प्रवाशांची तपासणी केली. त्यातील २३५ आंतररूग्ण होते. २११ रूग्णांना उपचार करून सोडून देण्यात आले आहेत. त्यातील २४ रूग्ण आज जरी रूग्णालयात असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही बाबतीत काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पुण्यात ३११ संशयित रूग्ण देखरेखीखाली आहेत. २३३ नमुने तपासणीसाठी पाठविले होते, त्यातील २२४ तपासणी नमुने प्राप्त झाले आहेत. ९ नमुन्यांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. अप्रमाणित नमुना एक आहे. सकाळपर्यंत ९ पॉझिटिव्ह होते. सद्यस्थितीला १० पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आजतागायत ३४४० नागरिकांचा पाठपुरावा पूर्ण करण्यात आला आहे. काही भागांमध्ये सर्व्हेलंस अॅक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे. ८७७७ घरांचे सर्व्हेलंस करण्यात आले आहे. ३०८७ लोकांची तपासणी केली त्यातील दोघांमध्ये काही लक्षणे आढळून आली. त्यांना त्वरीत नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले. ११२ जणांची आसोलेशन फॅसिलिटी आणि ५१० जणांची काँरेटाइन फॅसिलिटी उपलब्ध केली आहे, असेही म्हैसेकर म्हणाले.


हेही वाचा – विनाकारण करोनाच्या तपासणीची मागणी करू नये – राजेश टोपे


 

- Advertisement -

करोनाबाधित रूग्णांना कुटुंबापासून वेगळे ठेवले जात असल्यामुळे काही रूग्ण तणावात आले आहेत. त्यामुळे हे एक-दोन रूग्ण मीडिया आणि इतर लोकांना संपर्क करून चुकीची माहिती देत आहेत. ती माहिती पडताळून पाहिली असता ती खरी नाही, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. याबाबत कोणाला शंकाकुशंका असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी किंवा महापालिकेमध्ये संपर्क करून माहिती घ्यावी. रूग्णांच्या आहाराची काळजी घेतली जात आहे. आरोग्य यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही, अशा प्रकारची माहिती देवू नका. काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क साधा. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चारही जिल्ह्यामध्ये अद्याप एकही करोनाचा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आलेला नाही. जे पॉझिटिव्ह आहेत, ते परदेशातून आले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या घरामध्ये आयसोलेट करावे. तसेच कुटुंबाशीही कमीत कमी संपर्क ठेवावा. शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे कुठेही साहित्य पुरविण्यामध्ये त्यांच्याकडून अडचण निर्माण होणार नाही, अशीही माहिती म्हैसेकर यांनी दिली.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका…

सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविण्यांवर आमचा वॉच आहे. साताऱ्यामध्ये एक रूग्ण पॉझिटिव्ह आला, अशी बातमी फोटोशॉप करून पोस्ट करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. परंतु, त्या व्यक्तीने आपला मोबाइल बंद करून ठेवला आहे. त्यामुळे कुणीही अफवा पसरवली तर खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी प्रवास काही दिवस थांबबावा, असेही भाष्य म्हैसेकर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -