घरताज्या घडामोडीइटलीत करोनाचे तांडव, एक हजार जणांचा मृत्यू

इटलीत करोनाचे तांडव, एक हजार जणांचा मृत्यू

Subscribe

चीनसह जगातील १२४ देशांमध्ये हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसने इटलीत एक हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात एकट्या इटलीत १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

चीननंतर इटलीत एवढ्या कमी वेळात करोनामुळे लोक मृत्यूमुखी पडत असल्याने सरकारने सार्वजनिक ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे. याचपार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजेस, मॉल्स, लग्न समारंभ, वाढदिवस, पार्टी, पब, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेशच इटली सरकारने जारी केले आहेत. चीननंतर इराण, इटलीत शिरकाव करणाऱ्या करोना व्हायरस अनेक देशात पसरत असून चीन, इराणनंतर इटलीत त्याची सर्वाधिक लोकांना लागण झाली आहे. इटलीत वृद्ध नागरिकांची लोकसंख्या अधिक असल्याने येथील आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -