घरताज्या घडामोडीपुणेरी शैलीत खणाणले, आठवड्यातच १४ हजार 'करोना'चे कॉल्स

पुणेरी शैलीत खणाणले, आठवड्यातच १४ हजार ‘करोना’चे कॉल्स

Subscribe

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी पुणे यांनी आदेशान्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु झाल्याचे जाहीर केले आहे

पुण्यात करोनाच्या भितीपोटी आरोग्य विभागाचे कॉल सेंटर दिवसरात्र बिझी झाले आहे. चौकस अशा पुणेकरांनी करोनाच्या माहितीसाठी आणि चौकशीपोटी गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात कॉल सेंटरला कॉल्स केले आहेत. जवळपास आठवड्याभरापासून पुण्यातील आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरला करोना बाबतच्या चौकशीसाठीचे कॉल्स वाढले आहेत. अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीतच जवळपास १४ हजार कॉल्स करण्यात आले आहेत. पुण्यात करोनाचे संशयीत रूग्ण आढळल्याने आता लोकांच्या भीतीमध्ये आणखीच भर पडली आहे. पण आरोग्य विभागाचे कॉल सेंटर ही जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पार पाडत आहे.

पुण्यातील आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरमध्ये तिन्ही पाळ्यांमध्ये जवळपास २५ एक्झिक्युटीव्ही काम करत आहेत. सरासरी ७० कॉल्स एकजण हाताळत आहे. लोकांना आरोग्याविषयी माहिती देतानाच करोनाबाबतची जनजागृती करण्यासाठी हे कॉल सेंटर मदतीचे काम करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून करोनाबाबतची माहिती विचारण्यासाठी आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरचे फोन खणाणत आहेत. त्यामुळे सगळी कॉल सेंटरची टीम दिवसरात्र कामाला लागत आहे. करोनाबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच या व्हायरसची लागण होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येईल अशा गोष्टींसाठीही माहिती पुणेकर घेत आहेत. तसेच काय खावे, काय खाऊ नये अशा गोष्टींचीही विचारणा कॉल सेंटरवर करण्यात येत आहेत. पुण्याच्या आरोग्य विभागाच्या १०४ क्रमांकाच्या टोल फ्री क्रमांवर पुणेकरांनी करोनाच्या वाढत्या भीतीमुळे हे कॉल्स केले आहेत.

- Advertisement -

पुण्यात आपत्ती व्यवस्था कायदा लागु

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी पुणे यांनी आदेशान्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु झाल्याचे जाहीर केले आहे. पुर्वतयारी आणि प्रत्यक्ष अमंलबजावणीसाठी आरोग्य अधिकाऱ्यांची टीमही तैनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणु संसर्ग बाधित रूग्ण आढळत आहेत. करोनाचे रूग्ण पुण्यातही आढळून आले आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे गरजेचे आहे. विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्काळ उपाय योजना करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या संशयित रूग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यासाठीच हा कायदा अंमलात आणण्यात आला आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -