घरमहाराष्ट्रअबब.. पालापाचोळ्यात सापडले साडेतीन कोटी

अबब.. पालापाचोळ्यात सापडले साडेतीन कोटी

Subscribe

आरे अधिकारी प्रकरण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेली रक्कम

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केलेली साडेतीन कोटी रुपयांची रोकड आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घराजवळील बागेत, पालापाचोळ्यात आणि घरातील कचर्‍याच्या पिशवीतून हस्तगत करण्यात आली आहे.

आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्यासह शिपायाला सोमवारी ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नथू राठोड यांच्या घरी छापा टाकला असता काही कागदपत्रे आणि साडेतीन कोटी रुपयांची रोकड मिळून आली होती. नथू राठोड यांनी ही रोकड घरातील कचरा जमा करतात त्या प्लास्टिकच्या पिशवीत आणि घराबाहेर असलेल्या बागेतील पालापाचोळ्यात दडवून ठेवली होती, अशी माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी यांनी दिली आहे.

- Advertisement -

राठोड यांच्याकडे मिळून आलेल्या रोकडबाबत चौकशी केली असता त्यांना ती रोकड कुठून आली याबाबत उत्तर देता आले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही बेहिशोबी रोकड म्हणून जप्त केली आहे. दरम्यान, राठोड यांच्या घरात मिळून आलेल्या कागदपत्रावरून त्याच्या मालमत्तेबाबत चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -