घरताज्या घडामोडीPNB Bank Scam: फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकामध्ये बेड्या

PNB Bank Scam: फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकामध्ये बेड्या

Subscribe

पंजाब नॅशनल बंक घोटाळ्याप्रकरणातील मुख्य फरार आरोपी मेहूल चोक्सीला डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती अँटिगाच्या मीडियाने दिली आहे. माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी मध्य अमेरिका देशाच्या अँटिगा येथे वास्तव्यास होता. अचानक अँटिगामधून बेपत्ता झालेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिकामधून ताब्यात घेतले आहे. आता सध्या अँटिगामध्ये येण्याची तयार केली जात आहे.

- Advertisement -

१४ हजार कोटींच्या पीएम घोटाळ्याप्रकरणातील फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकाच्या सीआयडीने पडकले आहे. मेहुल चोक्सी अँटिगामध्ये वास्तव्यास होत्या. पण अँटिगाच्या मीडिया वृत्तानुसार गेल्या रविवारपासून मेहूल चोक्सी बेपत्ता होता. तो फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्या आधीच डॉमिनिकामधून त्याला बेड्या घातल्या आहेत. अँटिगा पोलिसांकडे त्याला सुपूर्द करण्याचे काम सुरू झाले आहे.

मेहुल चोक्सीच्या वकिलांने दावा केला आहे, ‘त्याचे क्लाईंड अँटिगाचे नागरिक आहेत. अशा परिस्थिती त्याला येथील लोकांना मिळणारे सर्व हक्क प्राप्त आहेत.’ अँटिगा एक कॅरेबियन देश आहे. मेहुल चोक्सीला ज्या देशातून पकडण्यात आले, तो अँटिगाच्या बाजूला देश आहे. पण मेहुल चोक्सीचा डॉमिनिकामध्ये जाण्याचा मागचा नेमक उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

- Advertisement -

मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर काही अधिकाऱ्यांसोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेत १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्या नीरव मोदी लंडनच्या जेलमध्ये असून दोघांविरोधात सीबीआय तपास करत आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -