घरमहाराष्ट्रताडोबात मीरा वाघिणीचा मृत्यू

ताडोबात मीरा वाघिणीचा मृत्यू

Subscribe

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये माया वाघिणीच्या बछड्याचा म्हणजेच २ वर्षांच्या मीरा वाघिणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पांढरपवनी येथे राहणाऱ्या माया वाघिणीचा बछडा पंचधारा या भागात मृतावस्थेत आढळला. रानगवा किंवा रानडुकराच्या हल्ल्यात या मीरा वाघिणीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. बछड्याच्या गळ्याला जखम असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

काय आहे घटना 

दोन दिवसांपूर्वी ताडोबा तलाव परिसरात माया आणि तिची दोन पिल्ले रानगव्याची शिकार करत होते. या दरम्यान रानगव्याची शिंदे मीराच्या छाती आणि पोटात खुपसली. ही माहिती मिळताच ताडोबा प्रशासनाने तिच्या जखमी किती गंभीर आहे. याचा अंदाज काढण्यासाठी तिची रेकी सुरु केली. मात्र या बाबत कुठला निष्कर्ष काढण्याआधीच तिचा मृत्यू झाला. ताडोबा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज, सोमवारी सकाळी ताडोबा तलाव परिसरात तिचा मृतदेह आढळून आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मनसेच्या अशोक मुर्तडक यांची माघार; नाशिक पूर्वमध्ये रंगणार दुरंगी लढत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -