Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र टॉमेटो भावातून वाहतूक खर्चही निघेना; शेतकरी आला मेटाकुटीला

टॉमेटो भावातून वाहतूक खर्चही निघेना; शेतकरी आला मेटाकुटीला

Subscribe

नाशिक : कवडीमोल दरामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषतः राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला बाजारभाव एवढा कमी आहे की, शेतातून बाजारपेठेत माल पोहोचविण्याचा खर्च देखील निघत नसल्याने उत्पादकांपुढे चक्क गायींपुढे टॉमेटो टाकण्याची वेळ आलेली आहे. (The market price of tomatoes is so low, Farmers worried)

महिनाभरापूर्वी २०० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज २ ते ५ रुपये किलोने अर्थात अगदी मातीमोल भावात विकला जात आहे. शेतकर्‍यांचे कैवारी म्हणवून घेणारे थेट नेपाळवरून टोमॅटो आयात करून शेतकर्‍यांना मारण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. कांद्याप्रमाणे टोमॅटोलाही प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी सुनील गवळी यांनी केली आहे. टोमॅटोचे भाव प्रतीकॅरेट २० किलोला ७० ते ९० रुपये झाल्याने ते खुडून विकण्यापेक्षा जनावरांना खाऊ घातलेले बरे, असे सर्व शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

रास्त भाव न मिळाल्याने शेतकर्‍यांनी टोमॅटो मार्केटयार्ड व रोडवर फेकून देत केंद्र सरकारचा निषेध केला. विशेषत: शेतीमालाचे भाव वाढले की संपूर्ण केंद्रिय यंत्रणाच ग्राहकांच्या पाठीशी उभी राहते. मग शेतीमालाचे भाव कमी झाल्यावर हीच यंत्रणा शेतकर्‍यांच्या पाठीशी का उभी राहत नाही, असा सवाल शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे. मात्र, सद्यस्थितीत शेतकर्‍यांचे मात्र प्रचंड नुकसान होत आहे.

काही दिवसांपूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता तेव्हा शहरातील गृहिणींचे बजेट कोलमडत होते. आता भाव मातीमोल झाल्याने ग्राहक समाधानी आहेत. पण, शेतकरी संतप्त झाले आहेत. जो भाव मिळतो आहे त्यातून शेतकर्‍यांना माल विकण्याचे पैसेदेखील निघत नाहीत. त्यामुळे आता केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा. : सुनील सूर्यभान गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव विंचूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -