घरमहाराष्ट्रढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक; गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका

ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक; गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका

Subscribe

मागील सव्वा ते दीड वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील गृहमंत्रीपद हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हेच देवेंद्र फडणवीस शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या निशाण्यावर आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यानच राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.(Supriya Sule aggressive on crumbling law and order Criticized the Home Minister)

मागील सव्वा ते दीड वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील गृहमंत्रीपद हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हेच देवेंद्र फडणवीस शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या निशाण्यावर आहेत. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत राज्यातील गृहखात्याचे अपयश ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सातत्याने ढासळत आहे. याचा परिणाम म्हणून सातत्याने काहींना लक्ष्य करुन त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत असा मोठा गोप्यस्फोट त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे ट्वीट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा टॅग केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आम्हाला अमित शहांचे जंगी स्वागत करायचे होते पण…; राऊतांचा शहांना टोमणा

- Advertisement -

या घटनांचा केला सुळेंनी उल्लेख

खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यावर टीका करता राज्यातील काही घटनांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्यांनी टिटवाळा, कल्याण येथे पास्टर जोस यांच्यावर झालेला हल्ला याचा उल्लेख केला असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतरांवर होणारे वाढते हल्ले ही अतिशय काळजीची बाब असल्याचे म्हटले आहे. तर अंतरवली, जालना येथे मराठा आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला आणि पुसेसावळी, (ता. खटाव, जि. सातारा) येथील दंगल असो या घटना गृहखात्याचे अपयश अधोरेखित करीत आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक ती पावले उचलणे अतिशय आवश्यक आहे असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिंडेंविरोधात पुणे न्यायालयात दाखल होणार खटला

याआधी माण तालुक्यातील घटनेवरून साधला होता निशाणा

चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून साताऱ्यामध्ये महिलेला भर चौकात बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संतप्त होत हा व्हिडीओ अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी असल्याचे म्हणत त्यांनी मागील महिन्यातच गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -