घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे हायवेवर वाहतूक कोंडी; मुंबई लेनवर कंटेनरचा अपघात

मुंबई-पुणे हायवेवर वाहतूक कोंडी; मुंबई लेनवर कंटेनरचा अपघात

Subscribe

गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त मुंबईमध्ये असणारे अनेक नागरिक आपल्या घरी परतत आहेत. आज, रविवार तर उद्या, सोमवार असल्याने आलेल्या सलग सुट्ट्यामुळे हजारो वाहन रस्त्यावर आली आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून आज सकाळी पासूनच अमृतांजन पुल, आडोशी बोगददा, खंडाळा या परिसरात वाहतूक कोंडी असून वाहतूक कासवगतीने सुरू आहे.

हेही वाचा – मोदी सरकारमुळेच देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंह यांची टीका

- Advertisement -

ही परिस्थिती आज दिवसभर राहील, असे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर दुसरीकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटल्यामुले मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास बंद होती. आज, सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. खंडाळा एक्झिट येथे कंटेनर पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्ध्यासाठी थांबवण्यात आली होती. यामुळे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अर्ध्या तासानंतर कंटेनरला बाजूला घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहितील तेथील वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -