घरमहाराष्ट्रनागपूरTuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांमध्ये भेसळ; गृहमंत्री फडणवीसांची चौकशीची ग्वाही

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांमध्ये भेसळ; गृहमंत्री फडणवीसांची चौकशीची ग्वाही

Subscribe

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या आठव्या दिवशी विधान परिषदेत आमदार महादेव जानकर यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाल्याची माहिती देताना आरोपींवर गुन्हे दाखल करण्याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शासनास निर्देश दिले होते की, हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. यानंतर आज महादेव जानकर यांच्याकडून पुन्हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजापुर देवस्थानामध्ये प्राचीन दागिन्यांमध्ये घोटाळा झाला आहे. याबाबत तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास करण्यात येईल. (Tuljabhavani Temple Tuljabhavani Devi jewelry is adulterated Testimony of Home Minister Devendra Fadnavis investigation)

हेही वाचा – Women Shakti Act : राज्यातील महिलांसाठीचा ‘शक्ती’ कायदा केंद्राकडे का रखडला? फडणवीसांनी दिली माहिती

- Advertisement -

विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर श्री तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराचा महत्ताचा विषय असल्याने यावर नीलम गोऱ्हे यांनी महादेव जानकर यांना निवेदन करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर महादेव जानकर यांनी निवेदन करताना म्हटले होते की, तुळजापुरच्या भवानी मातेचा एक प्राचीन मुकूट गहाळ झालेला आहे. एक किलो वजनाचा हा प्राचीन मुकूट आहे. तसेच तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट संस्थेच्या तिजोरीत असलेल्या दागिन्यांमध्ये देखील मोठी तफावत आहे. तिजोरीतून हिरे, मोती, माणिक, पाचू देखील गहाळ झालेले आहेत. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेले नसल्याने त्याचा तपास झालेला नाही. सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्येच हस्तक्षेप करत म्हटले की, याची चौकशी झाली असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे. मंदिर संस्थानच्या ताब्यात असलेल्या दागिन्यांचे वजन वाढलेले आढळल्याने यामध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याबाबत निर्णय करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Winter Session : शिक्षक भरतीत महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा; कपिल पाटील यांची मागणी

सदर प्रकरणी खुलासा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा गंभीर विषय आहे. शासनाने त्याची योग्य दखल घेतली आहे. आमच्याकडे सभापतींचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे तातडीने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातील. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -