घरमहाराष्ट्रप्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Subscribe

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत समाधान अवताडे यांनी प्रश्न विचारला होता. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात 72 वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली होती. पण अद्यापर्यंत एकही वसतिगृह बांधले नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

मुंबई: इतर मागासवर्ग समाजातील विद्यार्थ्यासाठी राज्यात वसतिगृह उभारण्यासाठीचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले होते. पण केंद्राने या प्रस्तावात त्रुटी काढल्या. राज्याने या त्रुटींची पूर्तताही केली आहे. तरीही अद्याप केंद्राकडून मान्यता मिळालेली नाही. मात्र केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दोन वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत समाधान अवताडे यांनी प्रश्न विचारला होता. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात 72 वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली होती. पण अद्यापर्यंत एकही वसतिगृह बांधले नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

- Advertisement -

त्यावर केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून राज्यातील इतर मागास वर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणा-या मुलांसाठी 18 आणि मुलींसाठी 18 अशी एकूण 36 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र आता पुढील शैक्षणिक सत्रापासून ही वसतिगृहे नक्कीच सुरू करण्यात येतील. त्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पोलीस विभागात 7231 पदांची भरती लवकरच

राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. तर 7231 पदांची भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे. यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. गृहमंत्री म्हणाले की, येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. काही ठिकाणी मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. तर येत्या काही दिवसात 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असंही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः Police Recruitment : पोलीस भरतीबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा; 7231 पदांची भरती लवकरच

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -