घरनवी मुंबईवाशीतील घाऊक बाजारपेठ पिचकारी, विविध रंगांनी फुलली

वाशीतील घाऊक बाजारपेठ पिचकारी, विविध रंगांनी फुलली

Subscribe

गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेकांमुळे होळी सणावर निर्बंध होते. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याकडे नागरिकांची पाठ फिरवली होती.

गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेकांमुळे होळी सणावर निर्बंध होते. त्यामुळे रंगपंचमी खेळण्याकडे नागरिकांची पाठ फिरवली होती. पण आता कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्यामुळे व निर्बंध देखील शिथिल करण्यात आल्याने यंदा होळी सण उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे होळीच्या रंगानी बाजारपेठ सजली आहे. तर रंगपंचमीनिमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरता ग्राहकांची देखील लगबग सुरू झाली आहे.

सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू असून ग्राहक नैसर्गिक रंगाला अधिक पसंती देत आहेत. त्याचबरोबर लहान मुले पबजी पिचकारीची मागणी करत असतात. दररोज ३० ते ४० पबजी पिचकाऱ्यांची विक्री होते.
– विष्णू पटेल, विक्रेता, वाशी बाजार

- Advertisement -

वाशीतील घाऊक बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्‍या विविध प्रकारच्या पिचकर्यांनी बाजारपेठ फुलली आहे. याच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांच्या झुंबड उडाली आहे. येथील बाजारात नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील ग्राहक स्वत:त घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येतात. बाजारात रंगाचे, पिचकाऱ्यांचे दर तेवढेच असून नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुखे रंग ८० ते १०० रुपये तर ओले रंग १८० रुपयांवर उपलब्ध आहेत. १९० ते ५०० रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टुन्सच्या पिचकाऱ्यांची क्रेज लहान मुलांमध्ये असते. यंदा मात्र पब्जी या खेळाची पिचकारी उपलब्ध असून लहानग्यांमध्ये याची अधिक क्रेज आहे. विविध डिझाइनच्या पिचकारी ८० ते ४५० रुपयांवर तर पबजी पिचकारी १९० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

पिचकाऱ्यांची किंमत –

  • पब्जी पिचकारी – १९० ते ५००
  • युनिकोन – ३०० ते ४००
  • गुजराती ड्रम – २०० ते ४००
  • छत्रीवाली पिचकारी – १५० ते २००
  • मछलीवाली पिचकारी – २० ते ५०
  • तटालीम टॉम – ५० ते १००

हेही वाचा –

सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा मात्र CID मार्फत तपास करणार, दिलीप वळसे पाटलांची विधानसभेत माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -