घरमहाराष्ट्रफलटणमध्ये विजेचा धक्‍का लागून २ वारकऱ्यांचा मृत्‍यू

फलटणमध्ये विजेचा धक्‍का लागून २ वारकऱ्यांचा मृत्‍यू

Subscribe

हृद्यविकाराचा झटका आल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता फलटणमध्ये विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक महिला भाविक गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फलटणमध्ये पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्‍का लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भाविकाचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये परभणीचे ज्ञानोबा चोपडे (वय ६५) आणि नांदेडच्या जाईबाई जामके (वय ६०) यांचा मृत्यू झाला तर परभणीच्या कमलाबाई लोखंडे (वय ६५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विजेचा धक्का बसून दोन भाविकांचा मृत्यू

फलटणमध्ये पालखी तळावरील पालापासून विद्युत वाहक तार गेली होती. पहाटे सव्वाचारच्या सुमारास तीन वारकऱ्यांना ही तार न दिसल्याने त्यांना या विद्युत वाहक तारेचा धक्का बसला. यात ज्ञानोबा चोपडे आणि जाईबाई जामके यांचा जागीच मृत्‍यू झाला तर, कमलाबाई लोखंडे या गंभीर जखमी झाल्‍या त्‍यांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

भाविकांचा मृत्यू होण्याची दुसरी घटना

पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाविकांचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना घडली आहे. तरडगाव ते फलटण मार्गावर माऊलींचा पालखी सोहळा येत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच ही घटना घडल्याने फलटण परिसरात शोककळा पसरली आहे.

सरकारच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या घरापासून लांब अंतरावर भाविक येत असतात यामध्ये अनेकदा वारकऱ्यांचा मृत्यू होतो. अशा लोकांना आळंदी देवस्थान व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदत करावी अशी मागणी वरकाऱ्यांमधून होत आहे. दरम्यान ही घटना राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -