घरमहाराष्ट्रराणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील

राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील

Subscribe

उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर टीका

राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. माझ्या मित्राकडे हे नको म्हणून भाजपला सावध करतोय. वाकवली मान आणि म्हणे पक्ष स्वाभिमान. मी भाजपला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे. मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत कसा बसू, अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते कणकवलीतील प्रचार सभेत बोलत होते.

सभेत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. करून करून भागले आणि देवपुजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेने त्यांना काढले, काँग्रेसनेही त्यांना काढले. आता शेवटचा पर्याय आहे. हा लढा सुसंस्कृत आणि खुनशी प्रवृत्तीविरुद्ध आहे. ही पाठीत वार करणारी औलाद आहे. ज्या पक्षाला सोडून गेले, त्या पक्षाचे राणेंना शाप आहेत. माझ्या मित्राकडे हे नको म्हणून भाजपाला सावध करतोय, भाजपात खूनशी वृत्ती नको. विनायक राऊत थांबले, वैभव नाईक उभा राहिला अन् त्यांना गाडले. आता स्वाभिमान शब्दही सर्वात खूश झाला असेल. मी भाजपाला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे.

- Advertisement -

ही भुतं तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. मी टीका करायला आलो नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले. दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तोडून-मोडून टाकू, कोकणी जनता भोळी-भाबडी आहे, परंतु अद्यापपर्यंत मर्दुमकी शिल्लक आहे हे कोणी विसरू नये. येणार्‍या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भगवा फडकावू, आम्ही गेली अनेक वर्षे त्यांना पाळले, परंतु आता ते मित्राकडे सुद्धा नको, अशी आमची मागणी होती. तरीसुद्धा त्यांना पक्षात प्रवेश देणार्‍या भाजपाला आम्ही शुभेच्छा देतो, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता त्याच्याही प्रचाराला आम्ही आलो असतो. जे समोर उभे आहेत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी लाथ मारून हाकलून लावले होते. शिवसेनाप्रमुखांनी यांना हाकलले म्हणून शिवसेना मोठी झाली. त्यानंतर हे काँग्रेसमध्ये गेले मग स्वतःचा पक्ष काढला आता भाजपामध्ये गेले. मी भाजपाला शुभेच्छा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आपले केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये आपलंदेखील मजबूत सरकार येत आहे. जे तुमच्या आडवे येतील त्यांना हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही. माझा छान हिरवागार कोकण राख करून नाणार उभा करणार असाल तर मला असा विकास नको, जे आहे ते टिकवायचे आणि दुसरे वाढवायचे याला म्हणतात विकास. हे आहे त्याला भुईसपाट करणे म्हणजे विकास नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -