घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या 'त्या' सुचनेचं मनसेकडून कौतुक; म्हणाले...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ‘त्या’ सुचनेचं मनसेकडून कौतुक; म्हणाले…

Subscribe

पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलाच्या लोकार्पणानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडून परिवहन विभागाकरीता घेतलेल्या अनेक निर्णयांचा पाढा वाचला. त्यावेळी कचऱ्यापासून रिंगरूट करा अशा सुचना नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलाच्या लोकार्पणानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडून परिवहन विभागाकरीता घेतलेल्या अनेक निर्णयांचा पाढा वाचला. त्यावेळी कचऱ्यापासून रिंगरूट करा अशा सुचना नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांच्या या सुचनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) कौतुक करण्यात आले. (Union Minister Nitin Gadkari MNS MLA Raju Patil)

पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकाच्या पुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याकारणाने ते कार्यक्रमाला गैरहजर राहिले.

- Advertisement -

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवरून नितीन गडकरींचे कौतुक केले. तसेच, आपल्या मतदारसंघातही (कल्याण) यासंदर्भात लक्ष द्यावे असेही पाटील यांनी सांगितले. “गडकरीजी, आपण आज पुण्यात सुचना केली की कचऱ्यापासून रिंगरूट करा. खरंच पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली बाब सांगितली आहे. माझी आपणांस विनंती आहे की आमच्या कल्याण मधील रिंगरूटची कचऱ्यापासून सुटका कशी होईल ते जरा बघितले व आमच्या प्रशासनाला जरा आपल्या भाषेत सुचना केली तर फार उपकार होतील. कारण आमच्या इथे रिंगरूट फक्त बिल्डरांच्या फायद्यापुरता तयार करत आहेत, इथे लोकांच्या सोयीचे कोणालाच सोयरसुतक नाही”, असे राजू पाटील यांनी म्हटले.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

- Advertisement -

“आम्ही कचऱ्यापासून वीजनिर्मित करणार आहोत. पण मी सांगतो करू नका. कारण आम्ही (केंद्र सरकार) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ग्रीन एनर्जीचे भाव कमी करून टाकले होते. त्यामुळे आता तुम्ही कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. माज्याकडे असलेली गाडी ही जपानमध्ये बनलेली असून ती हायब्रीड आहे. नागपूरमधील रिंगरोडवरीव केबल रुटवर देवेंद्र फडणवीस आणि मी बस सुरू करत आहोत. काही दिवसांपूर्वी टाटा कंपनीचे काही कर्मचारी आले होते. मी दिल्लीत रिंगरोड बांधला आणि या रिंगरोडमध्ये दिल्लीतील 30 लाख टन कचरा टाकला. पुण्यातील सगळा कचऱ्याचे विभाजन करून पुण्याच्या रिंगरोडवर टाकला, पुणे-बंगळुरू रोडवर टाकला, पुणे-अहमदाबाद रोडवर टाकला तर पुण्यात कचराच राहणार नाही. याबाबत मी पॉलीसी तयार केली असून कचरा फुकटमध्ये टाकून द्यायला तयार आहे. सॉलिड वेस्ट आणि लिक्वीड वेस्टपासून पुण्याला मुक्त करा”, असे नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -