घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड-जळगाव रेल्वेमार्गावर १४-१५ ऑगस्टला मेगाब्लॉक; ३३ रद्द तर १९ गाड्यांचे मार्ग बदलले

मनमाड-जळगाव रेल्वेमार्गावर १४-१५ ऑगस्टला मेगाब्लॉक; ३३ रद्द तर १९ गाड्यांचे मार्ग बदलले

Subscribe

नाशिक : मनमाड-जळगाव दरम्यान तिसरा रेल्वे रूळ टाकण्याकरिता रिमॉडेलिंगच्या कामासाठी दि. 14 आणि 15 ऑगस्ट दोन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात आला असून मेगा ब्लॉकमुळे मनमाडमार्गे मुंबई, नांदेड, पुणे या मार्गांवर धावणार्‍या 33 गाड्या रद्द करण्यात आल्या तर 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर भारतातून मुंबईकडे येणार्‍या, जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मनमाड, जळगाव दरम्यान तिसरा रेल्वे रूळ टाकण्याचे युद्ध पातळीवर काम केले जात आहे या कामासाठी तसेच रिमॉडेलिंगच्या कामाकरिता 14 आणि 15 ऑगस्ट असें दोन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

मेगा ब्लॉकमुळे 33 गाड्या रद्द तर 19 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून रद्द करण्यात आलेल्या गाड्या मध्ये देवलाळी -भुसावळ एक्सप्रेस, ट्रेन 22223 डाऊन) मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत (ट्रेन 17617) मुंबई-नांदेड़ एक्सप्रेस, (ट्रेन 11119) इगतपुरी-भुसावळ एक्सप्रेस,(ट्रेन1207) मुंबई-जालना एक्सप्रेस, (ट्रेन 02131) पुणे-जबलपुर एक्सप्रेस,(ट्रेन 01025) दादर-बलिया एक्सप्रेस,(ट्रेन 12139) मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस,(ट्रेन 11401) मुंबई-आदिलाबाद एक्सप्रेस, (ट्रेन 17617) – मुंबई-नांदेड़ एक्सप्रेस, (ट्रेन 17057) मुंबई-सिकंदराबाद एक्सप्रेस (ट्रेन 12113) पुणे-नागपुर एक्सप्रेस (ट्रेन 01752) पनवेल-रीवा रीवा एक्सप्रेस (ट्रेन 12135) पुणे-नागपुर एक्सप्रेस, (ट्रेन 11039) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस (ट्रेन 07427) या गाड्यांचा समावेश आहे.

अमृत भारत योजनेत मनमाड 

 देशभरातील 508 आणि महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानाकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तर भुसावळ विभागातील जवळपास 15 रेल्वेस्टेशनचा यात समावेश असणार आहे. जिल्ह्यातील मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 44.80 कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 20.03 कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 10.10 कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण रुपये 10.14 कोटी निधी मंजूर करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -