घरदेश-विदेशLive Update : उद्यापासून बेस्टच्या पास दरात वाढ

Live Update : उद्यापासून बेस्टच्या पास दरात वाढ

Subscribe

29/2/2024 23:20:53 उद्यापासून बेस्टच्या पास दरात वाढ

दैनिक पासदर 50 रुपयांवरून 60 रुपये

- Advertisement -

अमर्यादित मासिक पास आता 750 रुपयांवरुन 900 रुपये

गणवेशधारी विद्यार्थ्यांकरीता पूर्वी प्रमाणे मोफत पास असणार

- Advertisement -

29/2/2024 22:55:23 पालघर जिल्ह्यात दोन ज्येष्ठ नागरिकांची हत्या

भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं


29/2/2024 21:27:30 कृणाल पंड्याला लखनऊ संघाने उपकर्णधार पदावरून हटवले

निकोलस पूरनकडे दिली उपकर्णधार पदाची जबाबदारी


29/2/2024 17:27:23 शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंना भोजनाचे निमंत्रण

एकनाथ शिंदे गोविंदबागेत जाणार


29/2/2024 16:49:58 ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचं निधन

हेमंत जोगदेव यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 96 व्या वर्षी झालं निधन


29/2/2024 16:20:9 निलेश राणेंना कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेकडून दिलासा

तब्बल पावणेचार कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाई होणार होती


29/2/2024 16:20:9 पंकज मुंडे यांच्या कारखान्याला शिखर बँकेकडून मदत नाही


29/2/2024 13:0:29 खासदार नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.


29/2/2024 13:0:29 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष, अजमेरच्या टाडा न्यायालयाचा निकाल

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता झाली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.


29/2/2024 11:56:15 विधानपरिषदेचे 11 सदस्य उद्या होणार निवृत्त


29/2/2024 11:24:16 मस्जिद बंदरच्या भात बाजार परिसरातील घुसखोरांना बाहेर काढणार

मुंबई महापालिका उपायुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात आंदोलनंही केलं होतं. स्थानिकांऐवजी इमारतीमध्ये बांगलादेशी राहत असल्याचा राणेंचा आरोप आहे.


29/2/2024 10:58:54 घाटात पिकअपचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी असल्याचं समजत आहे. यामधील अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जातं आहे. बडझर घाटात पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. डिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्याशिवाय जखमींवर शाहपुरा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.


29/2/2024 10:54:45 इंटेलचे माजी अधिकारी अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू

नवी मुंबईतील पामबीच मार्गावर सकाळी सायकल चालवताना पाठीमागून आलेल्या वेगवान कॅबच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मित्रांसह सायकल चालवत असताना हा अपघात झाला.


29/2/2024 8:50:2 राज्यातील पोलीस उपायुक्त, अधीक्षक, उप अधीक्षकांच्या बदल्या

पोलीस उपायुक्त, अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या


29/2/2024 8:2:7 कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत बडगुजर हजर असल्याच निष्पन्न


29/2/2024 7:52:2 TMC नेता शेख शाहनवाजला अटक, कोर्टात करणार हजर 

पश्चिम बंगालमधील TMC चा नेता शेख शाहनवाजला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. 


29/2/2024 7:50:0 अकोले जिल्ह्याती मवेशी करवंदारमध्ये एका हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये 7 बालकांचाही समावेश आहे. 


29/2/2024 7:41:52 मागील तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशात बुधवारी पुन्हा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर , परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -