घरमनोरंजननाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव मांगले स्टेजवर कोसळले

नाटकाचा प्रयोग सुरु असताना वैभव मांगले स्टेजवर कोसळले

Subscribe

'अलबत्या गलबत्या' नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच मराठी अभिनेते वैभव मांगले स्टेजवर कोसळले.

‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच मराठी अभिनेते वैभव मांगले स्टेजवर कोसळले. सांगलीच्या भावे नाट्यगृहात मांगले त्यांच्या नाटकाचा शो सुरु होता. त्यादरम्यान त्यांना चक्कर येऊन ते प्रयोग सुरु असताना कोसळले असून त्यांना तातडीने सांगलीतील क्रांती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

सांगलीच्या भावे नाट्यगृहात ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. या प्रयोगा दरम्यान वैभव मांगले यांना अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवर कोसळले. या घटनेमुळे भावे नाट्य गृहातील ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. या नाटकात मांगले यांची मुख्य भूमिका आहे. तसेच चेटकीणीचा खूप मेकअप असतो, त्यामुळे त्यांना थोडा त्रास होऊन चक्कर आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

अलबत्या गलबत्या नाटकाचे गेले काही दिवस सतत प्रयोग सुरू आहेत. कालसुद्धा तीन प्रयोग झाले. आज सांगलीत प्रयोग सुरू असताना अगदी शेवटच्या सीनला वैभव मांगले यांना चक्कर आली. त्यामुळे प्रयोग रद्द केला. शेवटचं गाणं सुरू होत. प्रेक्षकांनी समजून घेतले. आता ते बरे आहेत. थिएटरला एसी नव्हता. तसेच त्यांचा चेटकीणीचा खूप मेकअप असतो. त्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. उद्या कोल्हापूरला एकाच थिएटर मध्ये तीन प्रयोग आहेत. वैभव सर ते प्रयोग करणार आहेत.  – सनीभूषण मुणगेकर – कलाकार, अलबत्या गलबत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -