घरमुंबईकाँग्रेसच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम

काँग्रेसच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील आजी माजी नगरसेवक मधुकर जगताप यांनी तडकाफडकी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनी ही पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत गोष्टीचा काँग्रेस पक्षाला चांगलाच फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेस महाआघाडीच्यावतीने निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले सुरेश टावरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेससोबतच काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील बंड केले असून ते देखील निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे त्यांच्या सहकाऱ्यांशी अर्थकारण करून पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना अवमान करत आहेत, त्यामुळे बहुतांश पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पालिकेचे माजी नगरसेवक मधुकर जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षांमध्ये सुरु असलेली अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. भिवंडीमध्ये सुरु असलेली गटबाजी थांबविण्यासाठी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे भिवंडीत आले होते. तांबे यांनी काही पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र, अनेकांनी या नियोजित बैठकीस आणि आयोजित केलेल्या प्रचार सभेकडे पाठ फिरविल्याने आमदार सत्यजित तांबे हे निराश होऊन भिवंडीतून निघून गेल्याची महिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

नगरसेवकांचा पक्षाला रामराम

दरम्यान, माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी देखील अंबाडी, शहापूर आदी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांना सुद्धा पक्षात सुरु असलेला गलथान कारभार आढळून आल्याने त्यांनी अर्धवट प्रचार सोडून भिवंडीतून काढता पाय घेतल्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांचे लहान भाऊ सिराज ताहीर मोमीन हे स्वतंत्रपणे महापौर जावेद दळवी यांच्या आदेशानुसार प्रचाराचे काम करीत आहेत. मात्र, असे असूनही शहराध्यक्ष शोऐब गुड्डू यांनी त्यांच्याशी प्रचार कार्यालयात भांडण केल्याने काँग्रेस पक्षाचे बहुतांश नगरसेवक नाराज झाले आहेत. ते प्रचारापासून अलिप्त राहत आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे माजी नगरसेवक मधुकर जगताप यांना अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी शहर अध्यक्ष खान आणि पक्षाचा निषेध करत शेकडो कार्यकर्त्यांसह पदाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपचा तंबू गाठला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पदाधिकारी, नगरसेवक आणि मतदारांची नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -