घरमहाराष्ट्रनाशिकवैदिक धर्म हाच खरा सनातन धर्म : विवेकसागर महाराज

वैदिक धर्म हाच खरा सनातन धर्म : विवेकसागर महाराज

Subscribe

प्रमुख स्वामी नगरमध्ये संत संमेलनाचे आयोजन

नाशिक :  सनातन हिंदू धर्माच्या सूर्याचे तेज म्हणजे भारत. भारतातील विविध संस्कृतीत सनातन संस्कृती खरा मार्ग आहे. भगवंतांनी आपल्या संस्कृती व धर्माचे रक्षण केले आहे. स्वामीनारायण वेगळा संप्रदाय नसून हिंदू धर्माची शाखा आहे. वैदिक धर्म खरा सनातन धर्म आहे. आमची मंदिरे, साधू, आध्यात्म वेगळे असू शकते परंतु धर्म एकच आहे, असे प्रतिपादन सदगुरू विवेकसागर स्वामी यांनी केले.

प्रमुखस्वामी महाराज शताब्दीनिमित्त प्रमुखस्वामी नगर, अहमदाबाद येथे राष्ट्रीय संत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात भारतातील विविध प्रांतातील संत-महंतांसह शंकराचार्य पूज्य सदानंद सरस्वती महाराजांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनानिमित्त मुख्य द्वारातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व संत-महंतांनी प्रमुखस्वामी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेत प्रमुखस्वामींच्या चरणी श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisement -

सदगुरू विवेकसागर स्वामी पुढे म्हणाले की, भगवान स्वामीनारायण द्विशताब्दीवेळी भारतातील तीन हजार साधू अहमदाबादमध्ये आले होते. त्यानंतर वेग-वेगळ्या संप्रदायाच्या साधूंचा भाव प्रमुखस्वामी महाराजांविषयी दिसत आहे. सनातन धर्माच्या प्रसारा करिता प्रमुखस्वामी महाराजांनी जगभरात मंदिरांची निर्मिती केली.

परमात्मानंद महाराज म्हणाले की, प्रमुखस्वामी महाराजांमध्ये अनेक कौशल्य गुण होते. त्यांनी आपल्या कौशल्य निपुणतेने बी.ए.पी.एस. चा जगभरात प्रसार केला. प्रत्येक संप्रदायाकरिता साधूंची आवश्यकता आहे. प्रमुखस्वामी महाराजांनी धर्म-नियम युक्त साधूंची सेना उभारली आहे. त्यांनी त्यांचे जीवन समाजाकरिता समर्पित केल्याने आजही आपली संस्कृती टिकून आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज म्हणाले की, आज सर्व साधू भारतीय साधू परंपरेतील प्रमुखस्वामी महाराजांना आदरांजली वाहण्याकरिता एकत्र आले आहेत. जगतगुरू शंकराचार्य सदानंद सरस्वतीजी महाराजांनी प्रमुखस्वामी महाराजांच्या जगभरात हिंदू धर्माच्या प्रसाराच्या कार्याचा गौरव केला. स्वामी कृष्णमणी महाराजांनीही मनोगत व्यक्त केले.

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -