घरदेश-विदेशआता राजधानी दिल्लीत महिलांसाठी मेट्रोचा 'मोफत' प्रवास

आता राजधानी दिल्लीत महिलांसाठी मेट्रोचा ‘मोफत’ प्रवास

Subscribe

दिल्लीमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी मेट्रो आणि डीटीसीमधून मोफत प्रवास देण्याची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर दारुण पराभवाला सामोरे गेलेल्या आम आदमी पक्षाने महिलांसाठीची मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी मेट्रो आणि डीटीसीमधून मोफत प्रवास देण्याची घोषणा केली आहे. आज, सोमवारी दुपारी केजरीवाल पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार आहेत. या निर्णयामागे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहान देण्याचा उद्देश आहे. महिलांना मोफत प्रवास प्रवास देऊन डीएमआरसीच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिल्ली सरकार करणार आहे.

यामुळे सरकारवर १२००० कोटींचा बोजा

बस आणि मेट्रोमध्ये महिलांच्या प्रवासाचे प्रमाण ३३ टक्के आहे. यानुसार दिल्ली सरकारवर प्रतीवर्षी १२०० कोटींचा बोजा पडणार आहे. दिल्ली सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या योजना कशी लागू करता येईल, तसेच मोफत प्रवासाचा पास देता येईल की अन्य कोणता पर्याय देण्यात येईल आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

या निर्णयाबरोबर फिक्स वीज बिल कमी करण्याबाबत दिल्ली सरकारने विचार सुरू केला आहे. एका सभेमध्ये बोलताना केजरीवाल यांनी याबाबत सुतोवाच केले. वीज नियामक प्राधिकरणाशी यासाठी चर्चा सुरू असल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्ली सरकारला विचारात न घेता दिल्ली फिक्स वीज बिलात वाढ करण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -