घरताज्या घडामोडीनववधूला गाडीच्या बोनेटवर बसवून व्हिडिओ शूटिंग भोवल, पोलिसांकडून गुन्हा दाखल

नववधूला गाडीच्या बोनेटवर बसवून व्हिडिओ शूटिंग भोवल, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Subscribe

गाडीमध्ये नववधूचे नातेवाईकही उपस्थित होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली

नववधूला गाडीच्या बोनेवटर बसवून व्हिडिओ शूटिंग करणं चांगलच भोवलं आहे. विवाह सोहळ्यासाठी जाताना दीवे घाटात गाडी थांबवून नववधू गाडीच्या बोनेटवर बसली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत फोटोग्राफर, नववधू आणि गाडीत असलेल्या नातेवाईकांवरही गुन्हा दाखल केला आहे. दीवेघाटात प्रवास करताना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातीह महत्त्वाचा क्षण असतो यामुळे लग्नादरम्यानच्या आठवणी फोटो आणि व्हिडिओच्या रुपात तरुणाई कैद करुन ठेवते परंतु अशा मोहापायी अनेकजण स्वतःला संकटात टाकत आहेत.

नववधू ही पुण्यातील भोसरी परीसरातील सहकार कॉलनी चक्रपाणी येथील रहिवासी आहे. वधू आपल्या विवाह सोहळ्यासाठी जाताना दीवे घाटात जाताना स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होती. यावेळी घाटाच्या मध्यभागी आल्यानंतर नयनरम्य दृष्य असणाऱ्या ठिकाणी गाडी थांबवली. नववधूला बोनेटवर बसवून फोटोग्राफर व्हिडिओ शूटींग करत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. गाडीमध्ये नववधूचे नातेवाईकही उपस्थित होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आणि नववधूच्या परिवारावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

का झाला गुन्हा दाखल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीवेघाटातून प्रवास करताना स्कॉर्पिओ गाडी भरधाव चालवत होता. तसेच घाटाच्या मधीच गाडी थांबवून नववधूला गाडीच्या बोनेटवर फोटो शूट केल्यानं नवरीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं गरजेचं आहे. गाडीत असलेल्या नातेवाईकांसह नववधू, फोटोग्राफर आणि वाहन चालकानेही मास्क वापरला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. यामुळे पोलिसांनी कारवाई करत भारतीय दंड संहिता कलम २६९,१८८,२७९,१०७,३३६,३४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २०५ कलम ५१ ब आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कलम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -