घरमहाराष्ट्रगडकरींचा एक कॉल आणि मुंबई-गोवा हाय-वेच्या कामाचा प्रश्न सुटला; विनायक राऊतांनी सांगितला...

गडकरींचा एक कॉल आणि मुंबई-गोवा हाय-वेच्या कामाचा प्रश्न सुटला; विनायक राऊतांनी सांगितला किस्सा

Subscribe

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नांवर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. चार वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडल्याची तक्रार विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली. ही तक्रार ऐकल्यानंतर नितीन गडकरींनी संबंधितांना फोन लावला आणि रखडेलं काम मार्गी लागलं.

मुंबई-गोवा महामार्गासाठी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत काम करणाऱ्या उपकंत्राटदारांची बिलं दीर्घकाळापासून रखडली आहेत. यामुळे कामंही थांबली आहेत. याच अनुषंगाने विनायक राऊत यांनी बुधवारी गडकरींची भेट घेतली. एमईपीने उपकंत्राटदारांच्या बिलांची रक्कम न दिल्याने चार वर्षांपासून कामही थंडावलं असल्याचं त्यांनी गडकरींच्या निदर्शनास आणून दिलं.

- Advertisement -

रत्नागिरीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या अरावली-कांटे आणि कांटे वाकड विभागांसाठी एमईपीने काम घेतलं होतं. त्यांनी ते काम उपकंत्राटदारांना दिलं. त्या उपकंत्राटदारांनी दिलेलं काम केलं. मात्र, केलेल्या कामांच्या बिलांची रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या उपकंत्राटदारांचं नुकसान झालं आहे, असं राऊत यांनीगडकरींच्या निदर्शनास आणून दिलं. गडकरी यांनी कंत्राटदारास फोन करुन थकित देय देण्याचे आणि काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -