घरताज्या घडामोडीAryan Khan Drugs Case: आर्यन खानचा कारागृहातील मुक्काम वाढला; मंगळवारी जामीन अर्जावर...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचा कारागृहातील मुक्काम वाढला; मंगळवारी जामीन अर्जावर होणार सुनावणी

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. काल, बुधवारी सेशन कोर्टात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. त्यामुळे आज हायकोर्टात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी न्यायमुर्ती नितिन साम्बरे ह्यांच्यासमोर पार पडली. यावेळी देखील आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता पुढच्या मंगळवारी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. (Bombay High Court To Hear Aryan Khan Bail Plea In Cruise Ship Drug Case On Tuesday)

आज सकाळी हायकोर्टाच्या सुनावणी पूर्वी शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला होता. शाहरुख आर्यनला १५ ते २० मिनिटांसाठी भेटला. त्यानंतर हायकोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितिन साम्बरे ह्यांच्या समोर आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई दोघेही उपस्थितीत होते. यावेळी वकील मानेशिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची मागणी केली. मात्र न्यायमूर्तींनी ही मागणी मान्य केली नाही. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीकडून जामिनावर आपले उत्तर दाखल केले जाणार आहे. तसेच याप्रकरणातील अटकेत असलेली मुनमून धमेचा हिच्या देखील जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज आर्यनला मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात हजर केले जाईल. त्याला कोर्टात प्रत्यक्षरित्या हजर न करताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे हजर केले जाईल. तसेच आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत आणखीन १४ दिवसांची वाढ केली जाईल.


हेही वाचा – Shahrukh Khan : आर्यनचा जामीन अर्ज सुनावणी ते शाहरुख खानची भेट २० तासात काय घडले ? वाचा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -