घरमहाराष्ट्रदुर्दैवी! विषप्रयोगाने सहा मोरांचा गेला जीव, वर्ध्यातला प्रकार उघडकीस

दुर्दैवी! विषप्रयोगाने सहा मोरांचा गेला जीव, वर्ध्यातला प्रकार उघडकीस

Subscribe

राज्यात उष्णतेचा पारा वाढत असल्याने वन्यप्राणी पाण्याचा शोधात जंगलातील पाणवठ्याचा आसरा घेत असतात. दरम्यान वर्ध्यातील थार-पार्डी रस्त्यावरील जंगलातील आड नाल्यातील पाण्यात विषप्रयोग करून सहा निष्पाप मोरांचा जीव घेतल्याला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान वन्यप्राण्यांची शिकारीवर राज्यात बंदी असतानाही अशा प्रकारचा घटना घडत आहेत. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा सुरु केला आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलातील वन्यप्राणी पाण्याचा शोधात मानवी वस्तीजवळ येतात, याच संधीचा फायदा घेत शिकाऱ्यांकडून प्राण्यांना टार्गेट करत अवैध्य शिकार केली जाते. याच हेतूने काही शिकाऱ्यांनी आड नाल्यात वन्यप्राण्यांचा शिकारासाठी विषप्रयोग केले पाणी पिण्यासाठी ठेवले होते. यावेळी या नाल्यावर आलेला मोरांना ते विषप्रयोग केले पाणी पिले आणि एकामागोमाग सहा मोरांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेची वनविभागाला माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सुहास पाटील व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी सहा मोर मृत अवस्थेत आढळून आले. यानंतर मोरांचे शवविच्छेदन करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कांबळे यांनी पाचारण करण्यात आले. या मोरांचे काही अवयव प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. दरम्यान हे मृत्यू नेमके कसे आणि कोणी केली याबाबतचा तपास प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच सुरु केला जाणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -