Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन हसताय ना हसायलाच पाहिजे, म्हणत 'चला हवा येऊ द्याची' टीम जयपूरला रवाना...

हसताय ना हसायलाच पाहिजे, म्हणत ‘चला हवा येऊ द्याची’ टीम जयपूरला रवाना !

कोरोना व्हयरसची चचणी करून योग्य खबरदारी घेऊनच कलाकार जयपूरला रवाना झाले आहेत. 'चला हवा येऊ द्या' मालिका 2014 पासून प्रेक्षकांचे मानोरंजन करत आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला नाके नऊ आणलं आहे. अत्यंत बिकट परिस्थिती जागोजागी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. तसेच रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमे अंतर्गत कडक लॉक डाऊन लागू केलं आहे. अशातच महाराष्ट्रात चित्रपट,मालिकांच्या चित्रिकरणास सुद्धा पूर्णपणेब्रेक लागला आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही खंड पडू नये तसेच चित्रिकरण सुरळीत चालू राहावे यासाठी अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला.झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेची टिम सुद्धा आता राज्याबाहेर चित्रीकरण करण्यास सज्ज झाली आहे. मालिकेचा संपूर्ण टिम ने शूटिंग साठी जयपूरमध्ये दाखल झाली आहे. शोसाठी खास सेट देखील उभारला असल्याची माहिती मिळाली आहे.. ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेच्या संपूर्ण टिमने एयरपोर्ट वरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच कोरोना व्हयरसची चचणी करून योग्य खबरदारी घेऊनच कलाकार जयपूरला रवाना झाले आहेत.

- Advertisement -

‘चला हवा येऊ द्या’ मालिका 2014 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्री मध्ये नाव कमावलं आहे. तसेच मालिकेमधील अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करतात. आता ही हास्याची गाडी लॉक  डाऊन मुळे  मधेच न थांबता अशीच सुरू राहणार असल्याचे दिसत आहे,
महाराष्ट्र लॉक डाऊन नंतर अनेक मराठी मालिकांनी आपला मोर्चा परराज्यात वळवला आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनी वरील जवळ -जवळ सर्व मालिकांचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर सुरू आहे.


हे हि वाचा – शूटींगसाठी मुंबई सोडली, गोव्यातही आता लॉकडाऊन अन् हिंदी मालिकांचे शूटिंग पुन्हा ठप्प

- Advertisement -