घरमहाराष्ट्रदबावाचे राजकारण जनता सहन करणार नाही; जयंत पाटलांचा इशारा

दबावाचे राजकारण जनता सहन करणार नाही; जयंत पाटलांचा इशारा

Subscribe

 

मुंबईः महाराष्ट्रात दबावाचे राजकारण जनता सहन करणार नाही, असा इशारा देत गर्भवती महिलांना मारहाण करणाऱ्या महिलांना तत्काळ अटक करा. पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना तत्काळ संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी केली.

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार हे स्वतः या बैठकीला हजर होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ही बैठक पक्ष बांधणीची होती. या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्ष बांधणीवर बैठकीत चर्चा झाली. पक्ष प्रत्येक बुथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर देण्यात आली आहे. महाराष्ट्रभर पक्षाचे विभागीय एक दिवसीय शिबीर होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार हे या शिबिरात स्वतः मार्गदर्शन करणार आहे. पक्षांतर्गत सध्या निवडणुका सुरु आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. संघटना वाढीवर बैठकीत अधिक चर्चा झाली. पक्ष वाढीसाठी नेते दौरे करणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना वरचढ होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मतदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील. या भीतीनेच ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. असं काही नाही. ही बैठक पूर्वनियोजित होती, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले.

- Advertisement -

वैभव कदम नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. वैभव कदमने आत्महत्या का केली याच्या खोलात जायला हवे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून टॉर्चर केले जात होते. जुन्या प्रकरणात दबाव आणला जात होता. दबाव का आणला ? मानसिक छळ का गेला ? कारण जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बोलल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक करता येईल यासाठी ठाणे पोलीस यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रकरणात ठाण्याचे कमिशनर काय करतात. याचा खुलासा झाला पाहिजे. आम्ही कायद्याने चालतो असे समजतो पण कायद्याला मुरड घालण्याचा प्रकार काही लोकांवर दबाव करुन केला जात असेल तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुढे जयंत पाटील म्हणाले, दोन गोष्टी आहेत एक म्हणजे मोदीसाहेब हे बीए आहेत म्हणून त्यांना देशाने पंतप्रधान केले असा भाग नाही. त्यांची डिग्री बघून देशाचे पंतप्रधान पद मिळाले आहे तर नाही …पण जर मोदींनी आपली डिग्री अशी आहे असे सांगितले असेल तर मग त्या डिग्रीच्याबद्दल प्रश्न निर्माण होत असेल आणि जनतेत त्याची चर्चा होत असेल तर त्याची नक्कीच चिकित्सा होत असते. त्यामुळे संबंधितांनी त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. मोदीचे पंतप्रधान पद हे त्या डिग्रीमुळे मिळाले असे आम्ही मानत नाही.

संभाजीनगरची दंगल कुणी केली. दंगलीअगोदर स्कुटरवरुन फिरत होते ते कोण आहेत.दंगलीच्यावेळी नेमकी कुणी कुणावर दगडफेक केली याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बघून लवकर पुढे आणावी. त्यावर उत्तर मिळेल जे अनिल बोंडेना अवघड जाईल. त्यामुळे बोंडेंनाच कळेल ही लोकं आपल्या ओळखीची आहेत. हे बोंडेंना अनुभवायला मिळेल. आणि म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी व कारवाई करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -