घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार - मुख्यमंत्री

आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार – मुख्यमंत्री

Subscribe

आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. यातच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्याच्या राजकीय वर्तुळातील हे सर्वात मोठं वक्तव्य असल्याचंही बोललं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये हे वक्तव्य केलं आहे. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाः युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, काय म्हणालेत मुख्यमंत्री वाचा

लोकसभेपूर्वी शिवसेना आणि भाजपाने केलेल्या युतीमुळे आणि त्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ – मोठे दिग्गज नेते बाहेर पडल्यामुळे या पक्षांना मोठं खिंडार पडलं आहे. यातच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण, आता मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद देतील अशी शक्यता आहे.

अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार 

या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, ” कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील. प्रत्येकी १३० ते १४० जागांवर आम्ही लढणार असून उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपाने १४४ जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी १२२ जागांवर विजय मिळाला होता. आता आम्ही अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार असून काही जागा मित्रपक्षांसाठीही सोडणार आहोत. यावेळी किती जागांवर विजय मिळेल याचा आकडा सांगता येणार नसला तरी तो नक्कीच विक्रमी असेल आणि याचा आम्हाला विश्वास आहे. ”

- Advertisement -

पक्षात हाऊसफुलचा बोर्ड 

फडणवीसांनी भाजपामध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशाबद्दलही भाष्य केलं. या पक्षप्रवेशांना ‘महाभरती’ असं म्हणणार नाही. पण, आता आम्ही हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे. असं असलं तरी काही अति महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांची पार्श्वभूमी तपासून, आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत. पण, हे नेते स्वच्छ चारित्र्यांचे असायला हवेत. तसेच त्यांनी जनतेची कामे केलेली असली पाहिजेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मोठ्या नेत्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याचं ही स्पष्ट आहे.

या पुढील निवणूक आम्ही केवळ विकास याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही राज्यातल्या जनतेला चांगले सरकार दिले असून आमच्यावर विश्वास ठेवावा असे जनतेला वाटत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -