घरदेश-विदेश"आम्हाला आमचे घर सोडायचे नाही...",हमासच्या हल्लावर भारतीय महिला म्हणाली

“आम्हाला आमचे घर सोडायचे नाही…”,हमासच्या हल्लावर भारतीय महिला म्हणाली

Subscribe

नवी दिल्ली : “सैन्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला आमचे घर सोडण्याचा कोणताही विचार नाही. हेच आमचे घर आहे आणि आमचा आमच्या सैन्यावरही विश्वास आहे. आम्हाला येथे शांततेत राहायचे आहे”, असे मत भारतीय वंशाच्या महिलेने एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना व्यक्त केले आहे. इस्रायलवर हमासने 7 ऑक्टोबर रोजी 5 हजार रॉकेट डागले होते. यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 3 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल असून 2800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना इलाना नागोकर म्हणाल्या, “काल येथे एक क्षेपणास्त्र पडले. ज्यामुळे वाहनांना आग लागली. यामुळे जवळपासच्या इमारतींमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. आम्हाला धोक्याची जाणीव आहे, सैन्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला आमचे घर सोडण्याचा कोणताही विचार नाही. हेच आमचे घर आहे आणि आमचा आमच्या सैन्यावरही विश्वास आहे. आम्हाला येथे शांततेत राहायचे आहे.  हल्ल्याबाबत बोलताना त्यांनी क्षेपणास्त्र नेमकी कुठे पडली तेही दाखवले. ती राहत असलेल्या इमारतीचेही नुकसान झाले आहे, खिडक्या आणि दरवाजे तुटले आहेत,” असेही तिने सांगितले. तसेच एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये खराब झालेली कार दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Israel-Palestine : इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय अभिनेत्रीच्या घरावर शोककळा; बहीण अन् मेहुण्याचा मृत्यू

- Advertisement -

इस्रायल-हमासमध्ये युद्ध सुरू

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झाले. आता दोन्ही बाजूंकडून रॉकेट, बॉम्ब आणि गोळ्या सतत डागल्या जात आहेत. बुधवारी इस्रायल आणि हमासच्या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत आतापर्यंत 3 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर, 2800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -