घरदेश-विदेश'संकटकाळात इस्रायलला सोडू शकत नाही', हमासच्या हल्ल्यानंतर भारतीय नर्सने ठामपणे सांगितले

‘संकटकाळात इस्रायलला सोडू शकत नाही’, हमासच्या हल्ल्यानंतर भारतीय नर्सने ठामपणे सांगितले

Subscribe

नवी दिल्ली : मी इस्रायलला संकट काळात सोडून जाणार नाही, असे भारतीय महिला प्रमिला प्रभूने ठामपणे सांगत मायदेशात परतण्यास नकार दिला आहे. गेल्या 6 वर्सांपासून प्रमिला हे इस्रायलच्या तेल अवीव याफो येथे नर्स म्हणून काम करत आहे. प्रमिला प्रभूने मायदेशी परतन्यासंदर्भात म्हणाली, “भारतातून माझे कुटुंबीय काळजीपोटी सतत फोन करत आहेत. मला दोन मुले आहे. मी त्यांना सोडून राहणे सोपे नाही. मला माझ्या मुलांची खूप आठवण येते. पण याचा अर्थ असा होत नाही की, मी संकटकाळात येथून पळून जावे. परिस्थिती पुर्वत झाल्यानंतर मी भारतात परतेन. मी आता इस्रायल सरकारच्या आवश्यकतेनुसार मदत करेन.”

हमासने इस्रायलवर हल्ला रॉकेट हल्ला केला. यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. इस्रायलमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. यात प्रमिला प्रभूचा ही समावेश आहे. “हमासने इस्रायलवर शनिवारी (७ ऑक्टोबर) रात्री 8. 30 वाजता सायरन वाजला. तेव्हा मी माझ्या अपार्टमेंटच्या तळघरातील बंकरमध्ये धाव घेतली. तेल अवीव याफोमध्ये अन्य शहरांच्या तुलनेत हल्ल्याचा तितकासा परिणाम झाला नाही. पण इस्रायल-हमास यांच्या युद्ध सुरू झाल्यापासून मी तीन वेळा बंकरमध्ये गेली आहे. मी आतापर्यंत एवढा हिंसाचार कधीच पाहिला नव्हात”, असे प्रमिलाने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – “आम्हाला आमचे घर सोडायचे नाही…”,हमासच्या हल्लावर भारतीय महिला म्हणाली

प्रमिला प्रभूप्रमाणे आणखी एक भारतीय महिलांनी इस्रायलमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना इलाना नागोकर म्हणाल्या, “काल येथे एक क्षेपणास्त्र पडले. ज्यामुळे वाहनांना आग लागली. यामुळे जवळपासच्या इमारतींमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. आम्हाला धोक्याची जाणीव आहे, सैन्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला आमचे घर सोडण्याचा कोणताही विचार नाही. हेच आमचे घर आहे आणि आमचा आमच्या सैन्यावरही विश्वास आहे. आम्हाला येथे शांततेत राहायचे आहे.  हल्ल्याबाबत बोलताना त्यांनी क्षेपणास्त्र नेमकी कुठे पडली तेही दाखवले. ती राहत असलेल्या इमारतीचेही नुकसान झाले आहे, खिडक्या आणि दरवाजे तुटले आहेत,” असेही तिने सांगितले. तसेच एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये खराब झालेली कार दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -