घरमहाराष्ट्रविरोधकांबद्दलही गुणग्राहकता ठेवा- सरसंघचालक

विरोधकांबद्दलही गुणग्राहकता ठेवा- सरसंघचालक

Subscribe

विरोधकांमध्येही काही चांगले गुण असतील तर त्याचा आदर ठेवला जावा असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

समाजात अनेक गुणी माणसे असून त्यांच्या गुणांची कदर होणे आवश्यक आहे. माणसांच्या नकारात्मक पैलुंपेक्षा त्यांच्या गुणांची चर्चा केली तरच समाज सशक्त होतो. त्यामुळे समाजात गुणग्राहकता वाढली पाहिजे. तसेच विरोधकांमध्येही काही चांगले गुण असतील तर त्याचा आदर ठेवला जावा असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे दयेणा-या राजरत्न पुरस्कारांचे आज, गुरुवारी वितरण करण्यात आले. स्थानिक महाल परिसरातील सिनीयर भोसला पॅलेस येथे आयोजित या पुरस्कार समारंभाला अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पिठाधिश्वर आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी महाराज भोंसले, राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ.राजे मुधोजी भोसले, कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मीकांत देशपांडे, ठाकूर किशोरसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नऊ जणांचा सन्मान करण्यात आला.

काय म्हणाले सरसंघचालक 

अध्यक्षीय भाषणात सरसंघचालक म्हणाले की,”समाजात समोरच्या व्यक्तीचे नकारात्मक गुणे अनेकदा पुढे आणले जातात. हल्ली लोक नकारात्मक गुणांची चर्चा अधिक करताना दिसतात. निवडणुकीच्या काळात तर अशा गोष्टींना फारच उधाण येते. परंतु, अनेक प्रसिद्धी माध्यमे हल्ली आठवड्यातून एकदा सकारात्मक बातमी देऊ लागले आहेत. समाजात लोकांना सकारात्मक गोष्टी आवडत असल्यामुळे हे परिवर्तन होऊ लागले आहे. समाजात दुसऱ्यांना मार्ग दाखविणारे अनेक जण दिसून येतात. मात्र अनेक जण स्वत: त्या मार्गावर चालत नाहीत. केवळ मार्ग दाखविणे याने काम होणार नाही. मार्ग दाखविण्यापेक्षा त्या मार्गावर चालणारे झाले पाहिजे, दुस-यांच्या आदर्श मार्गावर चालण्याची लोकांची इच्छा असते. मात्र हिंमत होत नाही. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला पाहिजे. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -