घरमहाराष्ट्रनिजामुद्दीन- मडगाव राजधानी एक्सप्रेसचे चाक घसरल्याने कोकण रेल्वे विस्कळीत

निजामुद्दीन- मडगाव राजधानी एक्सप्रेसचे चाक घसरल्याने कोकण रेल्वे विस्कळीत

Subscribe

निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचे चाक घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भोके आणि उशी या स्थानकादरम्यान हजरत निजामुद्दीन – मडगाव जंक्शन राजधानी एक्सप्रेसचे (Hazrat Nizamuddin-Madgaon Junction Rajdhani superfast special )चाक घसरल्याने झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील (Konkan Railway) वाहतूक खोळंबली आहे. गेली अनेक तास ही एक्सप्रेस करबुडे बोगद्यात अडकून पडली होती. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्यांनाही ब्रेक लागला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास हजरत निजामुद्दीन – मडगाव राजधानी एक्सप्रेच्या इंजिनचं चाक सरकल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पटरीवर आलेल्या दगडामुळे इंजिनचे चाक घसरले असे सांगितले जाते. या घटनेमुळे गेले काही तासं ही एक्सप्रेस करबुडे बोगद्यात अडकून पडली. रेल्वे प्रशासनाकडून अपघाताची माहिती मिळताच तातडीने इंजिन हटवत रेल्वे सेवा सुरळीत करण्याच्या कामाला सुरूवात झाली असून वाहतूक लवकरच सुरू होईल असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर काही निवडक गाड्या धावत असून त्याही एकामागोमाग एक थांबल्या आहे.

- Advertisement -

कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे. इंजिन रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

- Advertisement -

पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा दरड किंवा मोठे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प होत असते. यात मुंबई-गोवा मार्गावर वशिष्ठा नदीच्या पुलावरील कामांमुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. परंतु आता रेल्वे देखील खोळंबल्याने कोकणवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळून जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


Covid-19 : लहान मुलांवर ‘कोवॅक्सीन’च्या ट्रायलसाठी ‘सीरम’ची तयारी, लवकरचं DCGI कडून मिळू शकते मंजूरी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -