घरCORONA UPDATECovid-19 : लहान मुलांवर 'कोवॅक्सीन'च्या ट्रायलसाठी 'सीरम'ची तयारी, लवकरचं DCGI कडून मिळू...

Covid-19 : लहान मुलांवर ‘कोवॅक्सीन’च्या ट्रायलसाठी ‘सीरम’ची तयारी, लवकरचं DCGI कडून मिळू शकते मंजूरी

Subscribe

देशात कोरोनाबाधितांचा वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार लसीकरण मोहिम अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर लस उत्पादक कंपन्याही लसींचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच पुणेस्थित देशातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) १८ जूनपासून कोवोवॅक्स लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची तयारी केली आहे. लहान मुलांवर या लसीचे ट्रायल करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट लवकरचं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे मंजुरीसाठी अर्ज करणार आहे. सीरमने २०२० मध्ये अमेरिकेच्या नोवोवॅक्स इंक या लस निर्मात्या कंपनीसह लसीसंदर्भात करार केला होता. त्यामुळे नोवावॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूटकडून एकत्रितरित्या या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. ही लस कोरोना विषाणुवर ९० टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असून ती लहान मुलांनाही देता येणार आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात ही लस नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ” या लसीच्या १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल ट्रायलसाठी सर्वप्रथम डीसीजीआयकडे अर्ज करणार आहोत. त्यानंतर १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर कोवोवॅक्सच्या क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगीसाठी अर्ज करु. सध्या सीरम इन्स्टिट्यूटमार्फत देशात ‘कोव्हिशील्ड’ लसीचे उत्पादन घेतले जात आहे. त्यानंतर आता कोवोवॅक्स या दुसऱ्या लसीच्या उत्पादनालाही सीरममधून सुरुवात होणार आहे. या लसीवर सध्या क्लिनिकल ट्रायल केले जात आहे.

- Advertisement -

कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचच्या निर्मितीवर अदार पूनावाला यांनी केले ट्विट

याआधी शुक्रवारी पुण्यात कोवोवॅक्सच्या पहिल्या तुकडीच्या निर्मितीसंदर्भात माहिती देताना कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “आम्ही एक नवा मुक्काम गाठला आहे. पुण्यात कोवोवॅक्सच्या पहिल्या तुकडीचे उत्पादन या आठवड्यापासून सुरू झाले आहे. मी याबाबत खूप उत्साही आहे. कोवोवॅक्स ही लस १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या आपल्या भावी पिढीचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. परंतु या लसीचे अद्याप ट्रायल सुरु आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -